पुणे: "पंढरीची वारी झाली, आता तुकोबांच्या चरणी परतलो.." या भावनेने आषाढी वारीनंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहूनगरीत रविवारी (दि. ९ रोजी) दुपारी दोनच्या सुमारास परतली. पालखी वेशीवर येताच ग्रामस्थांसह देहू नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे, कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, प्रशासन अधिकारी प्रियांका कदम यांनी तुकोबारायांच्या पालखीला हार अर्पण करून स्वागत केले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या नामस्मरणाने देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत भूमी देहूनगरीत परतला. पालखीचे आगमन होताच ग्रामस्थ, वारकरी, भाविक आणि विविध दिंड्यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखी रथाचे औक्षण..
पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. पालखी महाद्वार कमानीमध्ये आल्यानंतर परंपरेप्रमाणे तुपे कुटुंबीयांकडून दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखी रथाचे औक्षण करण्यात आले. तळवडे, विठ्ठलनगर, माळीनगर, चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, येलवाडी, सांगुर्डीसह पालखी सोहळ्यात सहभागी होऊ न शकलेल्या हजारो भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली. देहूतील प्रमुख मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. विविध दिंड्यांमधून सुरू असलेले अभंग गायन, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसराला आध्यात्मिक वातावरण प्राप्त झाले होते.
पालखीच्या स्वागतानंतर देहूनगरीत पुन्हा एकदा तुकोबांच्या अभंगांचा आणि हरिनामाचा स्वर घुमला. पालखी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिर, बाजारआळी मार्गे जन्मस्थान मंदिर व विश्वंभर महाराज मंदिरासमोर आल्यानंतर 'श्री संताचीये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत' या अभंगाचे गायन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची आरती घेतली. वारीत सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना व सेवेकरी यांना पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे व उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे व संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रसाद देण्यात आला.
एकादशीच्या निमित्ताने देहूच्या देऊळ वाड्यात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे मंदिरात विधिवत महापूजा केली. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. पालखी चिंचोली येथील शनी मंदिर परिसरातील पटांगणावर काही काळ विसावली. दुपारी एकच्या सुमारास पालखी संतभूमी देहूकडे मार्गस्थ झाली.
शहर
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
महाराष्ट्र
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- कोल्हापूर: आजऱ्यात बिबट्याचा थरार; मोर पकडण्यासाठी मारली तब्बल सात फूट उंच उडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
- बीड: डीपीचे काम करताना खांबावरच विजचा तीव्र धक्का बसून कामगाराचा मृत्यू; सहाय्यक अभियंता व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल.
गुन्हा
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel


