कोल्हापूर:आजरा तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि थरारक बातमी समोर आली आहे. आजरा शहरात आणि लगतच्या परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, रविवारी सायंकाळी एका बिबट्याने मोराची शिकार करण्यासाठी चक्क ६ ते ७ फूट उंच उडी मारल्याची घटना घडली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आजरा आयटीआय (ITI) जवळ असलेल्या पारेवाडीच्या 'घोळ' नावाच्या शेतात रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. स्थानिकांच्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी मनोज देसाई आणि त्यांच्या शेतात कामाला असलेला सुनील कोरवी हे दोघे मोटारसायकलवरून शेतातून आजऱ्याकडे येत होते. त्याच वेळी त्यांच्या डोळ्यांसमोर एका बिबट्याने मोराची शिकार करण्यासाठी अचानक ६ ते ७ फूट उंच उडी मारली.
परंतु, सुदैवाने तो मोर बिबट्याच्या तावडीतून निसटला. शिकार हातून निसटल्यामुळे संतापलेला आणि डोळे वटारून केस फुलवलेल्या स्थितीत असलेला बिबट्या जवळच असलेल्या झुडपात जाऊन बसला. ही थरारक घटना स्वतः डोळ्यांनी पाहिल्यामुळे मनोज देसाई आणि त्यांचे सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आणि ते बिथरले. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून मोटारसायकलचा हॉर्न वाजवत तिथून काढता पाय घेतला.
पुन्हा आवाजाची नोंद आणि नागरिकांमध्ये भीती: तेथून थोडे पुढे आल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटांत पुन्हा एकदा मोरांचा मोठ्या प्रमाणावर आरडाओरड झाल्याचा आवाज ऐकू आला. यावरून बिबट्याने पुन्हा प्रयत्न करून कदाचित मोराची शिकार केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेच्या साधारण १५ मिनिटांनंतर, मनोज देसाई यांचे चुलतभाऊ बबलू देसाई हेदेखील त्याच मार्गावरून शेतातून घरी परतत असताना त्यांनाही तो बिबट्या त्याच झुडपात बसलेला स्पष्ट दिसला.
ही बातमी आजरा शहरात वाऱ्यासारखी पसरली. विशेषतः आजरा आयटीआय परिसर हा शहराच्या नजीकचे उपनगर असल्याने नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
शहर
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
महाराष्ट्र
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- बीड: डीपीचे काम करताना खांबावरच विजचा तीव्र धक्का बसून कामगाराचा मृत्यू; सहाय्यक अभियंता व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल.
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
गुन्हा
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel


