पुणे: शहरातील काकडेवस्ती परिसरात एका ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांचा साठा येणार असल्याच्या माहितीवरून पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी (दि. ९) छापा टाकला. मात्र, कारवाईदरम्यान पोलिसांना ड्रग्सऐवजी तब्बल २० पोत्यांमध्ये सुमारे १२०० किलो संशयास्पद खवा आढळून आला. हा खवा खाण्यास योग्य आहे का, शुद्ध आहे की बनावट, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधला. मात्र, सुट्टीचे कारण देत अधिकारी घटनास्थळी न आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्समधून परराज्यातून ड्रग्सचा साठा पुण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने काकडेवस्ती परिसरात संबंधित ट्रॅव्हल्सवर छापा टाकला. यावेळी २० पोत्यांमध्ये भरलेला सुमारे १२०० किलो संशयास्पद खवा आढळून आला.
इतक्या मोठ्या प्रमाणात खवा आढळल्यानंतर तो नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा वापर कशासाठी होणार होता, तसेच तो शुद्ध की भेसळयुक्त आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खव्याचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत आवश्यक असल्याने पुणे पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, रात्री उशिरापर्यंत एफडीएचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने पोलिसांसमोर मोठी अडचण निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकीकडे पोलिसांकडून संशयास्पद मालाबाबत तातडीने कारवाई करण्यात येत असताना, दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत टाळाटाळ होत असल्याचा प्रकार या घटनेमुळे चर्चेत आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. मात्र, स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सुट्टीचे कारण देत अशा गंभीर प्रकरणात तातडीने प्रतिसाद मिळत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शहर
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
महाराष्ट्र
- कोल्हापूर: आजऱ्यात बिबट्याचा थरार; मोर पकडण्यासाठी मारली तब्बल सात फूट उंच उडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
- बीड: डीपीचे काम करताना खांबावरच विजचा तीव्र धक्का बसून कामगाराचा मृत्यू; सहाय्यक अभियंता व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल.
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
गुन्हा
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.

























Subscribe to my channel


