पुणे: मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने पुण्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही,अशी खंत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पुण्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी मी अधिक वेळ देणार असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी दिली जाईल. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिर सोमवारी प्रथमच पुण्यात आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, अजय भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, 'विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची मोठी जबाबदारी असली, तरी मी राजकीय मर्यादांचे पालन करून पक्षसंघटनेसाठी सतत कार्यरत राहीन. विविध समाजघटकांतील आणि विशेषतः वंचित घटकांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील.'
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी देखील महत्त्वाची विधाने केली. ते म्हणाले की, 'सुषमा अंधारे यांच्याबाबतची माझी भूमिका ही वैयक्तिक आहे. त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या खऱ्या अर्थाने चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्त्या असल्याने कधीही पक्ष सोडणार नाहीत, असा मला पूर्ण विश्वास आहे. मात्र, पक्षाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.'
दरम्यान, स्वतः सचिन अहिर यांनी काही काळापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर ते विधान परिषदेचे उपसभापती झाले आहेत. असे असले तरी, जुन्या सहकाऱ्यांविषयी आणि सुषमा अंधारे यांच्या भूमिकेविषयी त्यांनी मांडलेले हे विचार राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांचा विषय ठरत आहेत.
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




