USA vs NAM America won the fourth match by 31 runs Namibia was eliminated from Group A t20 world cup 2026Image Credit source: USA Cricket Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अमेरिका आणि नामिबिया यांच्यात महत्त्वपूर्ण सामना पार पडला. या सामन्यातील पराभवामुळे नामिबियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर अमेरिकेचं गणित जर तर वर असणार आहे. अमेरिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच होता असंच म्हणावं लागेल. अमेरिकेने 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही नामिबियाला गाठता आलं नाही. हातात विकेट होत्या. पण धावांचं पाठलाग करताना चेंडू आणि धावांचं अंतर वाढलं. दडपण वाढल्याने वेगाने धावा करण्याच्या नादात काही विकेट गमावल्या आणि हातून सामना गमावला. अमेरिकेने हा सामना 31 धावांनी जिंकला. अमेरिकेचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय असून अजूनही सुपर 8 फेरीच्या आशा कायम आहेत. या भारत, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघही आहेत.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील या सामन्यात अमेरिकेकडून मोनांक पटेल आणि शायन जहांगीर यांनी सावध सुरूवात केली. या जोडीने पावर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 65 धावांची भागीदारी केली. संघाच्या 68 धावा असताना शायन जहांगीर बाद झाला. मोनांक पटेल 30 चेंडूत 52 धावा करून तंबूत परतला. तेव्हा संघाच्या 10.2 षटकात 89 धावा झाल्या होत्या. साईतेजा मुक्कमल्लाने 18 चेंडूत 17 धावांची खेळी केली. तर मिलिंद कुमार 20 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. पण असं असताना संजय कृष्णमूर्तीने एका बाजूने डाव सावरला. त्याने 33 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकार मारत नाबाद 68 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे अमेरिकेला मोठी धावसंख्या उभारता आली. शुभम रांजनेने 2 चेंडूचा सामना केला आणि नाबाद 5 धावांवर राहिला.
विजयी धावांचा पाठलाग करताना नामिबियाने चांगली सुरुवात केली. पावरप्लेमध्ये 1 गडी गमवून 57 धावा केल्या. जवळपास अमेरिकेसारखी स्थिती होती. तर 99 धावा असातना दुसरी विकेट गमावली. तेव्हा फक्त 10.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यामुळे उर्वरित 10 षटकात असाच खेळ झाला तर नामिबिया सामना पालटू शकते असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. लॉरेन स्टीनकॅम्प 58 आणि गेरहार्ड इरास्मस 6 धावा करून तंबूत परतले. त्यानंतर हा सामना पूर्णपणे अमेरिकेच्या हातात गेला. आता अमेरिकेचे साखळी फेरीत सर्व सामने संपले आहेत. आता सुपर 8 फेरीचं गणित जर तर वर असेल.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




