पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद

पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी सोशल मीडियाद्वारे संपर्क प्रस्थापित झाला होता. त्यानंतर संवेदनशील माहितीची देवाणघेवाण आणि संवादासाठी 'Signal' या एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्यानंतर फुरसुंगी येथील कार्यालयावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून टोळीशी संपर्क साधला गेला आणि त्यानंतर Signal अॅपवरून संवाद सुरू असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू आहे.

या प्रकरणात आधीच काही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून शस्त्रे आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आरोपींचे परस्पर संबंध, आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्याचा कट नेमका कसा रचला गेला याचा सखोल तपास सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *