झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला चारली धूळImage Credit source: Getty Images
AUS vs ZIM, T20 World Cup 2026 : कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आजा, 13 फेब्रुवारीला जे झालं त्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बीमध्ये झिम्बाब्वेने मोठो उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केलं. यासह, झिम्बाब्वेने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी यापूर्वी अमोनच्या संघाला पराभूत केले होते. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी 2007 मध्येही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर तब्बल 19 वर्षंनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
झिम्बाब्वेने उभारला मोठा स्कोअर
या मॅचमध्ये जे झालं त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. सामन्याच्या सुरूवातीला टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन संघान प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा झिम्बाब्वेने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 169 धावा केल्या. यादरम्यान, सलामीवीर ब्रायन बेनेटने नाबाद 64 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने 7 चौकार फटकावले. तर तादिवानाशे मारुमानीने 21 चेंडूत 35 धावांची शानदार खेळीकेली. रायन बर्लने 30 चेंडूत 35 धावा केल्या आणि कर्णधार सिकंदर रझाने 13 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या आणि संघाला या 169 धावांचा पल्ला गाठून दिला.
ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी 170 धावांचं आव्हान म्हणजे जणू काही डाव्या हाताच मळंच. त्य्यांना हे टार्गेट सहज गाठता येईल असं बहुतांश लोकांना वाटलं. मात्र ऑस्ट्रेलियाची सुरूवातच वाईट झाली. पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्या, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर फक्त 38 होता. स्टार फलंदाज जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड आणि ट्रॅव्हिस हेड लवकर बाद झाले, जो ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता. मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे मॅट रेनशॉ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात 77 धावांची भागीदारी झाली, त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु झिम्बाब्वेने डेथ ओव्हर्समध्ये पुनरागमन केले आणि सामना सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकांत 146 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना तब्बल 23 धावांनी पराभव पत्करावा लागला.
वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी आणि ब्रॅड इव्हांस हे झिम्बाब्वेच्या यशाचे शिलेदार ठरले. ब्लेसिंग मुजरबानी ने 4 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा देत 4 बळी टिपले. तर ब्रॅड इव्हान्स याने 3.3 ओव्हर्समध्ये 23 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं. या दोन्ही गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. वेलिंग्टन मसाकाड्झा आणि रायन बर्ल यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात या दोन्ही संघांमध्ये फक्त 2 सामने खेळले गेले आहेत आणि दोन्ही वेळा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजय मिळवला.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




