पुणे : जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) रद्द झाल्याने आगामी निवडणुकीत या गटातून निवडून आलेल्या सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळवताना खुल्या गटातील मातबरांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आता पुढील काही दिवसांत जिल्हा परिषदेची निवडणूक ओबीसी आरक्षण वगळून जाहीर करावी लागणार आहे. परिणामी ऐन पावसाळय़ात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेची मार्च महिन्यात मुदत संपून सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. ओबीसी आरक्षणामुळे लांबलेली निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये गत पंचवार्षिकमध्ये ७५ गट होते त्यांची संख्या वाढून आता ८२ एवढी झाली आहे. ७५ गटांपैकी २० गट ओबीसींसाठी राखीव होते, येत्या निवडणुकीत ८२ गट झाले, तर ओबीसी आरक्षण असलेल्या गटाची संख्या एकने वाढू शकते. गेल्या पंचवार्षिकमध्ये ओबीसी आरक्षण, त्यामध्ये महिला ओबीसी राखीव गटातून निवडून आलेल्या २० जणांपैकी दोघे जण गेल्या पाच वर्षांत अध्यक्ष राहिले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांमधील चार ते पाच ओबीसी सदस्यांनी विविध पदे भूषवली आहेत. ओबीसी आरक्षण नसल्याने आता यांच्यासह या प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची निवडणुकीची वाटचाल काहीशी आव्हानात्मक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात ८३ ऐवजी ८२ गट ग्रामीण विकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेसाठी ८३ गट निश्चित केल्याचे राजपत्र जाहीर केले आहे. मात्र, ही संख्या निश्चित करताना मंचर ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात येऊन या ठिकाणी नगरपंचायत निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक गट कमी झाला असून ही संख्या ८२ एवढी निश्चित झाली आहे. याबाबतची सुधारणा राजपत्रात लवकरच केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




