Pune auto driver dies by suicide due to constant harassment by ex-girlfriend!

पुणे: एक्स-गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून पुण्यात तरुण रिक्षाचालकाची आत्महत्या!

Pune auto driver dies by suicide due to constant harassment by ex-girlfriend!
पुणे: घोरपडे पेठ परिसरातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुण रिक्षाचालकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागे एका ३२ वर्षीय महिलेचा मानसिक छळ कारणीभूत असल्याचे उघड झाले असून, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?
मृत तरुणाचे नाव गणेश अशोक हलवाई (वय २४, रा. घोरपडे पेठ) असे आहे. त्याचे स्वप्नाली संतोष तावरे (वय ३२, रा. महाड, जि. रायगड) या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाले होते. त्यानंतर नातेवाइकांनी मध्यस्थी करून दोघांनीही एकमेकांशी संपर्क तोडण्याचा निर्णय घेतला होता.

मानसिक छळ आणि धमक्या:
हा निर्णय घेऊनही स्वप्नाली तावरे हिने गणेशचा पिच्छा सोडला नाही. ती वारंवार त्याला त्रास देऊ लागली. इतकेच नाही तर, "तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करेन," अशी धमकी तिने गणेशला दिली होती. एका बाजूला पोलीस कारवाईची भीती आणि दुसऱ्या बाजूला महिलेचा सततचा मानसिक त्रास यामुळे गणेश अत्यंत तणावाखाली होता.

पोलिसांची कारवाई:
या त्रासाला कंटाळून गणेशने अखेर आपले आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. याप्रकरणी गणेशची बहीण कोमल नीलेश सोनवणे यांच्या तक्रारीवरून, खडक पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नाली तावरे हिच्याविरुद्ध 'आत्महत्येस प्रवृत्त' केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ताळीकोटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *