पैठण, छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तहसील कार्यालयात जमिनीच्या सातबाऱ्यावरील फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी एका महिला शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या 'शोले' स्टाईल आंदोलनामुळे तहसील परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
नेमके प्रकरण काय?
पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील रहिवासी असलेल्या शोभा बबन कुदळे (वय ५९) या महिला शेतकऱ्याने हे आंदोलन केले. शोभा कुदळे आणि त्यांचे पती बबन मारुती कुदळे (वय ६५) यांच्या मालकीच्या कारकीन शिवारातील गट क्रमांक ३०५ या शेतीवर दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावे चुकीच्या पद्धतीने फेरफार घेण्यात आला होता. हा फेरफार रद्द करण्यासाठी कुदळे दांपत्याने महसूल विभागाकडे अनेकदा निवेदने दिली होती. ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांनी याबाबत प्रशासनाला आत्मदहनाचा इशाराही दिला होता, मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
शोले स्टाईल आंदोलन:
सोमवारी सायंकाळी कुणीही काही समजण्यापूर्वी शोभा कुदळे या तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढल्या. त्यांनी सातबारा दुरुस्तीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली आणि आत्मदहन करण्याची धमकी दिली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांची तत्परता:
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे आणि पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिला पोलीस कर्मचारी एस. एस. रगडे, एन. एच. बिरुटे, के. एस. उगले आणि ठोकळ यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या धाडसाने शोभा कुदळे यांना पाण्याच्या टाकीवरून सुखरूप खाली उतरवले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या या प्रकरणाची महसूल विभागात मोठी चर्चा असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तहसील कार्यालयात जमिनीच्या सातबाऱ्यावरील फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी एका महिला शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या 'शोले' स्टाईल आंदोलनामुळे तहसील परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
नेमके प्रकरण काय?
पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील रहिवासी असलेल्या शोभा बबन कुदळे (वय ५९) या महिला शेतकऱ्याने हे आंदोलन केले. शोभा कुदळे आणि त्यांचे पती बबन मारुती कुदळे (वय ६५) यांच्या मालकीच्या कारकीन शिवारातील गट क्रमांक ३०५ या शेतीवर दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावे चुकीच्या पद्धतीने फेरफार घेण्यात आला होता. हा फेरफार रद्द करण्यासाठी कुदळे दांपत्याने महसूल विभागाकडे अनेकदा निवेदने दिली होती. ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांनी याबाबत प्रशासनाला आत्मदहनाचा इशाराही दिला होता, मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
शोले स्टाईल आंदोलन:
सोमवारी सायंकाळी कुणीही काही समजण्यापूर्वी शोभा कुदळे या तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढल्या. त्यांनी सातबारा दुरुस्तीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली आणि आत्मदहन करण्याची धमकी दिली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांची तत्परता:
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे आणि पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिला पोलीस कर्मचारी एस. एस. रगडे, एन. एच. बिरुटे, के. एस. उगले आणि ठोकळ यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या धाडसाने शोभा कुदळे यांना पाण्याच्या टाकीवरून सुखरूप खाली उतरवले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या या प्रकरणाची महसूल विभागात मोठी चर्चा असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला जात आहे.
शहर
- बाईकचे मायलेज वाढवायचेय? इंधनाची बचत करणाऱ्या ६ अत्यंत प्रभावी आणि सोप्या टिप्स!
- पुणे: जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा होणार; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
महाराष्ट्र

गुन्हा
- सांगली हादरली! "मुलगा होत नाही, माहेरहून सोनं आणत नाहीस"; छळाला कंटाळून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू.
- सांगली हादरली! ६४ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडिता २७ आठवड्यांची गर्भवती!
- गुजरातमध्ये माणुसकीला काळीमा! पतीने ५० हजारात पत्नीला विकले; टोळीकडून अत्याचार, पतीसह ७ जण गजाआड.
- सांगली: तामिळनाडूमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 'मुलगा होत नाही' म्हणून सासरच्यांकडून छळ, पतीसह ५ जणांवर गुन्हा
राजकीय
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- "आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.
- राजगुरुनगर (खेड): राक्षेवाडी ग्रामपंचायत प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
इतर
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!
- एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येणार नाही; 'जॉब्स अपोकॅलिप्स'ची भीती चुकीची - सॅम ऑल्टमन

Subscribe to my channel