मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती
राज्यातील 29 महापालिकांसह मुंबई महापालिकेचीही निवडणूक झाली. त्यात भाजप शिवसेनेला बहुमत मिळालं असून या आठवड्यात मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार आणि उपमहापौर कोणाकडे असणार यांचीही घोषणा झाली. या निवडणुकांनंतर नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला. 227 नवनिर्वाचित नगरसेवक आणि 10 नामनिर्देशित सदस्य असे मिळून एकूण 237 नगरसेवकांचे सभागृह यावेळी पाहायला मिळणार आहे. याचसंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई पालिकेत एकूण 10 नामनिर्देशित सदस्य कार्यरत असणार आहेत. तसेच या स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण क्षेत्रात व प्रशासनाचे विशेष ज्ञान असणे बंधनकारक असेल. मात्र त्यांना समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसेल. मुंबई महानगरपालिकेत नामनिर्देशित (स्विकृत) सदस्यांची संख्या आता 10 होणार आहे. या सदस्यांची नियुक्ती करताना ठराविक अनुभव असणे बंधनकारक होईल. पण या नामनिर्देशित सदस्यांना पालिकेतील कोणत्याही समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसणार. राज्यात मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी म्हणून किमान पाच वर्षे कार्य केलेली व्यक्तीही नामनिर्देशित सदस्य म्हणून पात्र ठरणार आहे. मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याते, मुख्याध्यापक यांचा शिक्षण तज्ज्ञ म्हणून समावेश होईल. नगरसेवकांच्या संख्येनुसार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
भाजप आणि ठाकरेंच्या वाट्याला किती जागा?
यामध्ये भाजपकडून 4, शिवसेना (ठाकरे) गटाकडून 3, शिंदे शिवसेनेकडून 1, काँग्रेसकडून 1 आणि एमआयएमकडून 1 असे एकूण 10 नामनिर्देशित सदस्य असतील. 2017 नंतर बदल झाला आहे. 2017 सालापर्यंत मुंबई महापालिकेत केवळ 5 नामनिर्देशित सदस्यांची तरतूद होती. मात्र, राज्य सरकारने महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करून ही संख्या 5 वरून 10 करण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे आता पालिकेत एकूण 10 नामनिर्देशित सदस्य कार्यरत असणार आहेत.
मुंबईचा महापौर बसल्यानंतर पुढील कार्यक्रमांना पालिकेकडून वेग
मुंबईचा महापौर बसल्यानंतर पुढील कार्यक्रमांना पालिकेकडून वेग आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष तसेच इतर अध्यक्ष पदाच्या आणि सदस्यांचा कार्यक्रम, पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे वेळापत्रक पालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यतचे पालिकेत होणारे कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहिर झाले आहे.
असा असेल कार्यक्रम
16 फेब्रुवारी – दुपारी 2.30 वाजता महानगर पालिकेची विशेष सभा होणार आहे. स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 सदस्यांची निवड करणे, बेस्ट समितीवर 16 सदस्यांची निवड करणे , विरोधी पक्ष नेत्याची निवड करणे असे कार्यक्रम आहे.
18 फेब्रुवारी – स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, बेस्ट समितीच्या पदासाठी अर्ज दाखल करणे
20 फेब्रुवारी – स्थायी समिती, शिक्षण समिती अध्यक्षांची निवड करणे .
23 फेब्रुवारी – सुधार समिती आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षाची नेमणूक
24 फेब्रुवारी – पालिकेची मासिक सभा, स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकुब केली जाईल
25 फेब्रुवारी – स्थायी समितीची साप्ताहिक सभा दुपारी 1 वाजता होणार आहे.
तर पालिकेची सभा दुपारी 3 वाजता तहकूब होईल.
1. 10 स्वीकृत सदस्यांची नेमणूक 2. वृक्ष प्राधिकरण स्थापना करून त्यावर सदस्याची नेमणूक 3. विशेष समित्या गठीत करून त्यावर सदस्यांची नेमणूक 4. सल्लागार समिती गठीत करून सदस्यांची नेमणूक
26 फेब्रुवारी – फेब्रुवारी महिन्याची तहकुब सभा दुपारी 2.30 वाजता
1. विशेष समितीवर प्रत्येकी 36 सदस्यांची नेमणूक 2. उपनगरीय प्रवासी रेल्वे समितीवर सल्लागार समितीवर एका प्रतिनिधीची नेमणूक करणे 3. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या विश्वस्थ मंडळावर महानगर पालिकेच्या दोन प्रतिनिधिंची नेमणूक करणे
27 फेब्रुवारी – मराठी भाषा गौरव दिन
4 मार्च – प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणे (17 प्रभाग समित्या)
5, 6 आणि 9 मार्च प्रभाग समितीवर अध्यक्ष नेमणूक करणे .
10 मार्च -विशेष समित्याच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणे
1. स्थापत्य समिती (शहर) 2. स्थापत्य समिती (उपनगर) 3. सार्वजनिक आरोग्य समिती 4. बाजार आणि उद्यान समिती 5. विधी समिती 6. महिला आणि बालकल्याण समिती
12 मार्च – स्थापत्य समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करणे
16 मार्च – विधी समिती, महिला बाल कल्याण समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करणे
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




