अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी, समीर सोनीImage Credit source: Instagram
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागवान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रवी चोपडा यांचा हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा कुटुंबच्या कुटुंब थिएटरकडे वळले होते. या चित्रपटात आईवडील आणि मुलांकडून त्यांना दिली जाणारी वागणूक याविषयीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पालकांनी त्यांच्या मुलांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्यांना आता मुलं ओझं समजू लागले आहेत, अशा आशयाची ही कथा होती. या चित्रपटाच्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी मुलांविषयी जे भाषण दिलं, ते ऐकून आजही अनेकांचे डोळे पाणावतात. 2003 मध्ये आणि त्यानंतर काही वर्षांपर्यंत जरी या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं असलं तरी आता जवळपास दोन दशकांनंतर त्यावर टीका होऊ लागली आहे. हीच टीका पाहून बिग बींच्या ऑनस्क्रीन मुलाला दिलासा मिळाला आहे.
दोन दशकांनंतर ‘जेन झी’ वर्ग या चित्रपटाकडे समकालीन आणि आलोचनात्मक दृष्टीकोनातून पाहू लागलं आहे. या चित्रपटात अभिनेता समीर सोनीने अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर एका इन्फ्लुएन्सरने ‘बागबान’मधल्या काही दृश्यांवर टीका करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हाच व्हिडीओ समीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही रील शेअर करताना समीरने व्यंगात्मक आणि बदलत्या काळाचं, बदलत्या विचारांचं कौतुक केलं आहे. ‘अखेर 20 वर्षांनंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. मला नवीन पिढी खूप आवडतेय’, असं त्याने लिहिलं आहे.
संबंधित रीलमध्ये इन्फ्लुएन्सरने समीर सोनीच्या व्यक्तीरेखेचं समर्थन केलंय. “बागबानमधील हा माणूस खरंतर ‘ग्रीन फ्लॅग’सारखा आहे. पण त्याला खलनायकाच्या रुपात दाखवलं गेलंय. तो त्याच्या पत्नीचं ऐकतो, वेळेवर घरी येतो, वेळेवर कामाला निघून जातो, पत्नीला डिनरसाठी घेऊन जातो, लग्नाचा वाढदिवसही त्याच्या लक्षात असतो. इतकंच नव्हे तर हा मुलगा हुशारसुद्धा आहे. कारण तो त्याच्या वडिलांना प्रश्न विचारतो की तुमची कोणती एफडी, पीपीएफ नाही का? बँकेत काम करणाऱ्या वडिलांनी सेव्हिंग का केली नाही, हे विचारणं काही चुकीचं नाही”, असं यामध्ये म्हटलं गेलं आहे.
चित्रपटाच्या दुसऱ्या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन रात्रीच्या वेळी टाइपराइटरवर टाइप करत बसतात. ज्या सुनेला दुसऱ्या दिवशी लवकर उठून कामावर जायचं असतं, तिला रात्री झोपताना टाइपराइटरच्या आवाजाचा त्रास होत असेल तर याच चुकीचं काय आहे? ते हे काम दिवसासुद्धा करू शकले असते. प्रत्येक गोष्टीच मुलं किंवा सुनाच चुकीच्या नसतात, असं त्यात म्हटलं गेलं आहे. या रीलवर नेटकरीसुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
महाराष्ट्र
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?

























Subscribe to my channel




