आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत खासदार, आमदार, माजी आमदार यांचे नातेवाईक मैदानात उतरले होते. यातील काही उमेदवारांचा विजय झाला आहे, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नेत्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
- पुणे जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांनी शानदार विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या अंजली घोगरे यांचा पराभव केला.
- सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे आ गोपीचद पडळकरांच्या वाहिनी माधवी पडळकर मैदानात होत्या. त्यांनी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा पराभव केला.
- शिवसेनेचे नेते तानाजी सावतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत मानेगाव,माठा येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुहास पाटील यांचा पराभव केला.
- आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिणी खोत वागणी वाळवा येथून मैदानात होत्या, त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उर्मिला घनवट यांचा पराभव केला.
- मंत्री दतात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे इदापूर पंचायत समितीच्या मैदानात उतरला होते, त्यांनी भाजपच्या सचिन धापटे यांचा पराभव केला.
- आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा शेखर निकम या राष्ट्रवादीकडून सावर्डे, चिपळूण येथून मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांचा पराभव केला.
- माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी सस्कृती सातपुते भाजपकडून दहिगाव, माळशिरसमधून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या जीवन जानकर यांचा पराभव केला.
- आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आमेर अभई, सिल्लोड येथून मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपच्या त्र्यंबक गव्हाणे यांचा पराभव केला.
- खासदार संदिपान भुमरे यांते पुतने शिवराज भुमरे आडूळ, पैठण येथून शिवसेनेकडून मैदानात उतरले होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास शेळके यांचा पराभव केला.
- माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी पूनमताई राजपूत नागद, सिल्लोडमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात होत्या, त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकलाबाई राठोड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
- भाजपचे आमदार बबनराव लोणीकर याच्या कन्या मीनाक्षी पवार भाजपकडून हातनूर, सिल्लोड येथून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या कौशल्याबाई पवार यांचा पराभव केला.
- भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तेरमधून सक्षणा सलगर यांच्या विरोधात मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी शानदार विजय मिळवला आहे.
- माजी आमदार संजय वाघचौरेच्या पत्नी सुनिता वाघचौरे ढोरकीन, पैठणमधून राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांचा शिवसेनेच्या राधिका जगताप यांनी पराभव केला.
- माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे भाजपकडून उत्रौली कारळभोर येथून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या रणजित शिवतारे यांचा पराभव केला.
- खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलतबंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील फोडशिरस, माळसिरसमधून मैदानात उतरले होते, त्यांनी भाजपच्या हरिदास वाघमोडे यांचा पराभव केला.
- आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतण्या निखिल चव्हाण मैदानात भाजपकडून गणोरी, फुलंब्री येथून मैदानात उतरला होता, त्याने काँग्रेसच्या संदीप बोरसे यांचा पराभाव केला.
- सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचे पुत्र यशराज साळुंखे जवळा, सांगोला येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या अतुल पवार यांचा पराभव केला.
- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे या लक्ष्मी दहिवडी येथून शरद पवार गटाकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांना भाजपच्या करुणा शिवसरण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
- मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील निवडणूक लढवत होते. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी त्यांचा पराभव केला आहे
- माजी आमदार मानसिंग नाईक यांचे पुत्र विराज नाईक मैदानात मागले, शिराळा येथून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपच्या विजय पाटील यांचा पराभव केला.
- आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड हे कुंडल,पलूस कडेगाव येथून काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात होते. त्यांनी भाजपच्या धनश्री लाड यांचा पराभव केला.
- खानापूर तालुक्यात नागेवाडी गटात आमदार सुहास बाबर यांची भावजय शीतल अमोल बाबर या शिवेसनेकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी भाजपच्या सुजाता माने यांचा पराभव केला.
- आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची पत्नी शांभवी कल्याणशेट्टी चपळगाव, अक्कलकोट येथून भाजपकडून मैदानात उतरल्या होत्या, त्यांनी शिवसेनेच्या अंजली भरमशेट्टी यांचा पराभव केला.
- माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या सुनबाई प्रेरणा समशेर वरपूडकर या देठणा, परभणी येथून भाजपकडून मैदानात उतरल्या होत्या, काँग्रेसच्या ज्योत्सना घाडगे यांनी त्यांचा पराभव केला.
- माजी आमदार सुरेश वरपूडकर यांची मुलगी सोनल देशमुख वरपूडकर या झरी, परभणी येथून ठाकरे गटाकडून मैदानात उतरल्या होत्या, भाजपच्या दिलीपराव देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.
- माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर हे सिगणापुर, परभणी येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीच्या एकनाथ साळवे यांनी त्यांचा पराभव केला.
- माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर हे सिगणापुर, परभणी येथून भाजपकडून मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीच्या एकनाथ साळवे यांनी त्यांचा पराभव केला.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




