सोलापूर: 'झाडे लावा, झाडे वाचवा' हा केवळ एक नारा नसून ते काळाची गरज आहे, हे सोलापूर शहरात करण्यात आलेल्या एका प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कडक उन्हात दुपारी १.३० ते २ या वेळेत केलेल्या एका निरीक्षणात असे दिसून आले की, ज्या रस्त्यावर झाडांची दाट सावली आहे, तिथे तापमान नियंत्रणात आहे; मात्र जिथे झाडे नाहीत, तिथे तापमानाचा पारा चटका लावणारा आहे.
प्रत्यक्ष प्रयोगातून वास्तव समोर
शहरातील दोन प्रमुख मार्गांवर थर्मामीटरच्या साहाय्याने तापमान मोजले असता धक्कादायक वास्तव समोर आले:
१. व्हीआयपी रोड (संगमेश्वर कॉलेज ते जुना एम्प्लॉयमेंट चौक): या रस्त्याच्या दुतर्फा मोठी आणि गर्द झाडी आहे. भर उन्हात इथे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दाट सावलीमुळे पादचाऱ्यांची येथे मोठी वर्दळ दिसून आली.
२. सात रस्ता ते रेल्वे स्थानक मार्ग: या मार्गावर वृक्षराजीचा अभाव असून मोठ्या प्रमाणात डांबरीकरण आहे. इथे थर्मामीटरवर थेट ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. झाडे नसल्यामुळे केवळ ५०० मीटरच्या अंतरावर तापमानात ३ अंशांची मोठी वाढ दिसून आली.
तज्ज्ञांचा इशारा: ४३ अंशांवर उष्माघाताचा धोका
फिजीशियन डॉ. सुनील गोविंदे यांच्या मते, ४० अंश तापमानात शरीरातून प्रचंड घाम येतो, ज्यामुळे थकवा आणि डिहायड्रेशन जाणवते. मात्र, तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्यास शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा कोलमडू शकते. यामुळे उष्माघात (Heat Stroke) होऊन अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो.
डांबरीकरण आणि 'अर्बन हीट आयलंड'
हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी स्पष्ट केले की, सिमेंट आणि डांबर उष्णता लवकर शोषून घेतात आणि ती वातावरणात परावर्तित करतात. यामुळे शहरात 'अर्बन हीट आयलंड' तयार होत आहेत. २००१ ते २०२४ या काळात महाराष्ट्राने सुमारे २२,४०० हेक्टर वृक्षच्छादित क्षेत्र गमावले आहे. झाडे केवळ सावली देत नाहीत, तर ती 'नैसर्गिक एअर कंडिशनर' सारखे काम करतात.
देशी वृक्षांची लागवड हाच एकमेव पर्याय
वाढत्या सिमेंटच्या जंगलात सोलापूरचे तापमान नियंत्रणात ठेवायचे असेल, तर रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागी देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे हाच एकमेव वैज्ञानिक आणि शाश्वत उपाय आहे. जर आपण आताच सावध झालो नाही, तर भविष्यात सोलापूरचे तापमान नवे उच्चांक गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

