पुणे: पुण्यातील हायप्रोफाईल क्वीन्स गार्डन परिसरात राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्याच पत्नी आणि मुलाला बॅटने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे गंभीर पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
"मी मंत्र्यांचा ओएसडी, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही" मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमधील संशयास्पद चॅटबद्दल विचारणा केल्यामुळे कारंडे यांनी आपल्या पत्नीवर आणि मध्यस्थी करणाऱ्या मुलावर क्रिकेटच्या बॅटने खुनी हल्ला केला. "मी मंत्र्यांचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही," अशा दर्पोक्ती करत कारंडे यांनी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मारहाणीचे फोटो समोर आले असून, त्यात पीडित पत्नी आणि मुलाच्या अंगावर निळेशार वण दिसून येत आहेत, जे या हल्ल्याची भीषणता दर्शवतात.
मंत्र्यांच्या पंखाखाली गुंडांना अभय?
या घटनेवर संताप व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सत्तेच्या उबेखाली हे लोक इतके माजले आहेत की, स्वतःच्या पोटच्या मुलाला बॅटने फोडून काढताना त्यांचे हात थरथरले नाहीत. आपल्या पत्नीला आणि निष्पाप मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणारा हा नराधम अद्याप मोकाट कसा? मंत्र्यांच्या पंखाखाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का?" असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना विचारला आहे.
शक्ती कायदा मोदी सरकारने गुंडाळून ठेवला
पुण्यात आजोबाने नातीवर बलात्कार केल्याच्या आणि कारंडे यांच्या घरगुती हिंसेच्या घटनांचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी 'शक्ती कायद्या'ची मागणी पुन्हा लावून धरली आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेला शक्ती कायदा मोदी सरकारने बासनात गुंडाळून ठेवला आहे. राज्यातील लेकींच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणण्याची हिंमत सध्याच्या राज्य सरकारमध्ये नाही," अशी टीका त्यांनी केली. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हकालपट्टीची मागणी
कारंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली केली असतानाही मंत्री सावे यांनी अद्याप त्यांना पदावरून का हटवले नाही? असा प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी कारंडे यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. या घटनेमुळे उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अधिकारांच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
महाराष्ट्र
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

