मुंबई : एका महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिली. तसेच त्यांच्या ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही महिला इंदूरची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील रेणू शर्मा या महिलेला इंदूर येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिस रेणू शर्माला मुंबईत दाखल करणार आहेत.
आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली. तसेच त्यांना ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. ५ कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मुंडेंकडे लावला. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय रेणू शर्माने खोटी कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करून बदनामी करून त्यांच्या मंत्रीपद घालण्याचा धमकी त्याने दिली होती. तसं करायचा नसेल तर पाच कोटीचे घर आणि पाच कोटींची कंपना द्या, अशी मागणीही तिने केली होती. आरोपी महिलेविरोधात पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


