ते 1978 चे वर्ष होते. भारतातील काळोख्या सिनेमागृहांत ‘डॉन’, ‘त्रिशूल’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चनची हवा होती. मात्र, साडेअठरा वर्षांचा असताना माझ्यासाठी खरा ड्रामा रूपेरी पडद्यावर नव्हे, तर घराच्या ड्रॉइंग रूममध्ये सुरू होता. पहिला पगार मिळाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी वडिलांनी मला जवळ बसवले. तिथे कोणतेही उत्सवाचे वातावरण नव्हते. ते म्हणाले, ‘आता कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर आहे. मला तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी बचतीवर लक्ष द्यायचे आहे.’ बस, त्याच क्षणी माझा मुंबई लोकलचा फर्स्ट क्लासचा त्रैमासिक पास आणि नवीन चकचकीत घड्याळ घेण्याचे स्वप्न भंगले. माझे ते ‘ब्लॉकबस्टर’ वर्ष तुटलेल्या सामानाची दुरुस्ती, भाड्याच्या घराला रंगरंगोटी करणे आणि ते नीटनेटके करण्यात निघून गेले. वडिलांचा मंत्र होता- ‘तुझा पगार, तूच मालक.’ त्यावेळी मला हे एखाद्या ओझ्यासारखे वाटले, पण पाच दशकांनंतर जेव्हा मी भूतकाळात डोकावतो, तेव्हा वाटते की ते ओझे नसून खरं तर उत्तम शिकवण होती. त्यांनी माझ्याकडून स्वतःच्या पैशांबाबत चुका करून घेऊन माझ्यामध्ये आर्थिक समज निर्माण केली. दोन वर्षांनंतर मी केवळ चित्रपटच पाहिले नाहीत, तर जबाबदाऱ्या सुरू होण्यापूर्वीच मला प्रत्येक रुपयाची किंमत समजली होती. आता आपण वर्तमानाकडे वळूया आणि जयपूरबद्दल बोलूया. तिथल्या एका आईने मला पत्र लिहिले की, घरात सुरू असलेल्या वादविवादांमुळे तिचे मन अस्वस्थ आहे. तिच्या पतीची इच्छा आहे की, महिनाभरापूर्वीच पहिली नोकरी सुरू करणाऱ्या त्यांच्या 18 वर्षांच्या मुलाने घराचे भाडे द्यावे आणि वीज तसेच इंटरनेटचे बिल शेअर करावे. त्या विचारतात, ‘आम्ही हावरटपणा तर करत नाही ना? आजकाल मुले 25 वर्षांची होईपर्यंत शाळेत शिकत असतात. आपण त्यांना काही काळ जीवनाचा आनंद लुटू देऊ नये का?’ हे मुलांचे संगोपन आणि त्यांना सक्षम करणे यातील एक घालमेल आहे. आपल्या मुलाने पहिल्या कमाईचा आनंद घेण्यासाठी ‘हनीमून फेज’ मिळाला पाहिजे, असे आईला वाटते, तर दुसरीकडे, वडील त्याला एक सज्ञान व्यक्ती मानतात, ज्याला हे समजले पाहिजे की ‘इंटरनेट’ ही मोफत मिळणारी सुविधा नसून तो बजेटचा एक भाग आहे. मी त्यांना लिहिले, ‘मला खात्री आहे की तुमच्या पतीचे बालपण खडतर नसेल आणि ते कोणत्या हावरट कुटुंबातीलही नसतील. नक्कीच त्यांना आपल्या मुलाला बजेट नियोजनाचा मौल्यवान अनुभव द्यायचा असेल. त्याच्या इच्छांसाठीच नाही, तर बिल भरण्यासाठीही ही सज्ञान जीवनातील एक जबाबदारी आहे. सुरक्षित मार्गाने अशा गुंतागुंती समजावून सांगितल्यामुळे तुमच्या मुलाला केवळ बजेटिंगच नाही, तर विविध आर्थिक जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचा आणि त्या पूर्ण करण्याचा अनुभव मिळेल. विचार करा, जर त्याने पैसे भरण्यास उशीर केला, तर त्याचे परिणाम तसे नसतील जसे प्रत्यक्ष बिल भरण्यास उशीर झाल्यावर होतात. तिथे तर मोबाइलच्या बाबतीत मोठा दंड आकारला जाईल किंवा वीज कापली जाईल. हळूहळू दिलेला असा अनुभव तरुणांना आधार देत भविष्यासाठी प्रशिक्षित करण्यासारखा आहे. माझा हाच सल्ला आहे की, तुमच्या तिघांमधील ही चर्चा शिक्षेसारखी नसून सहकार्याच्या भावनेतून व्हावी.’ मनी सायकोथेरपिस्ट आणि फॅमिली एक्सपर्ट््स देखील ‘लक्झरी’ ऐवजी ‘शिक्षण’ देण्याच्या बाजूने असतात. त्यांचा असा सल्ला आहे की, कमवणाऱ्या सज्ञान मुलाकडून योगदान घेण्याचा अर्थ असा नाही की पालकांना पैशांची गरज आहे, तर हा आर्थिक शहाणपणाचा विषय आहे. अनेक पालक भाडे घेतात, पण ते पैसे सेव्हिंग अकाउंट किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा करतात. पुढे जाऊन जेव्हा मुलगा स्वतःचे वेगळे घर घेतो, तेव्हा तेच भाड्याचे पैसे त्याला सरप्राइज डाऊन पेमेंट किंवा इमर्जन्सी फंड म्हणून परत केले जातात.
1978 मध्ये मी ‘कसमे-वादे’ चित्रपटाचा पहिला शो चुकला होता, कारण मी खुर्ची दुरुस्त करत होतो. आज जयपूरचा तो मुलगा कदाचित वीकेंड आउटिंग मिस करेल, कारण तो वाय-फाय बिल भरत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



