पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:गुणांचा उपयोग योग्य वेळी इतरांच्या सेवेसाठी करा!

आपले सर्वोत्तम योगदान नेहमी वेळेतच दिले पाहिजे, हा व्यवस्थापन क्षेत्रातील एक मोलाचा सल्ला आहे. यात ‘सर्वोत्तम’ आणि ‘वेळ’ या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपले जीवन बालपण, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धत्व या चार टप्प्यांतून वेगाने पुढे जात असते. एका रूपकाच्या माध्यमातून या चार अवस्था समजून घेता येतील. बालपण म्हणजे शहरातल्या गल्ल्यांसारखे असते. मुले खेळतात, लोकांची ये-जा असते आणि एक जिव्हाळा जाणवतो; मात्र गल्ल्या नाहीशा होत आहेत. तारुण्य म्हणजे शहराच्या मध्य भागातून जाणारा मुख्य रस्ता. तेथे जास्त वाहतूक असते. तारुण्यातही विचार, परिस्थिती, व्यक्तींची अशीच कोंडी होते. प्रौढावस्था ही शहरातल्या पुलासारखी आहे. तेथून सोयीनुसार वरून निघून जाऊ शकता. वृद्धत्वाला एखादा हायवे समजा. तेथे टोल भरा आणि आरामात प्रवास करा. आयुष्यातील या चार अवस्था नीट समजून सर्वोत्तम योगदान द्यावे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *