पिंपरी चिंचवड शहरातील खून प्रकरणाचा लागला छडा; हत्या करून बावधनच्या नाल्यात फेकले होते प्रेत!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील बावधन येथील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सिमेंटच्या पोत्यात भरून हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि मारेकऱ्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने एक दुचाकीच्या हालचालीवरून हिंजवडी पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीच्या मारेकऱ्यांना शोधून काढले आहे. 

राजू दिनानाथ महातो असे नाल्यात मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू महातो खून प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी सुनील मुन्ना चव्हाण, मुन्ना फुनी चव्हाण, योगेंद्र श्री गुलले राम आणि बरिंदर श्री गुलले राम या चार आरोपींना अटक केली आहे. यातील मयत आणि आरोपी हे घर पेंटिंग काम करणारे असून त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून त्यांनी राजू महातोचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *