पुणे : ‘‘शिक्षण देशाच्या गरजेची निगडित व मातृभाषेत हवे. पण आजही आपण इंग्रजीवर भर देत आहोत. प्रत्येक भागाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत तर त्याचे उत्तर देखील वेगळे असेल. त्यामुळे प्रादेशिक समस्या समजून घेत मातृभाषेत शिक्षण असायला हवे. तसेच आपले शिक्षण आणखी अर्थपूर्ण बनविण्याची गरज आहे,’’ असे मत शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.
‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने वांगचुक यांना मंगळवारी (ता.१२) ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’चे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना वांगचुक यांनी आपले विचार मांडले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, खासदार रजनी पाटील, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती टिळक, प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक-मोने आणि अभिनेता ओमी वैद्य यावेळी उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन यावेळी वांगचुक यांच्या हस्ते करण्यात आले.
वांगचुक म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना पुढील २५ वर्षांत देखील विचार करायला हवा. देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षांनी शतक पूर्ण होतेय. तोपर्यंत आपण विश्वगुरू म्हणून उदयाला यायला हवे. तसेच जगाच्या आकाशात आपले अस्थीत्व आणखी मजबूत व्हावे.’’
शिंदे म्हणाले, ‘‘शिक्षणाची नस पकडून समाजाचे प्रश्न हाताळावे लागतील हे टिळक-आगरकर यांनी सांगितले होते. त्यांचे विचार पूर्ण करणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल. टिळकांनी शिक्षणाचा पाया घातला होता. तो वांगचुक यांनी मनापासून स्वीकारला आहे.
वांगचुक यांनी डोंगराळ भागात शिक्षणाचा यज्ञ पोचवला. तो सर्व उत्तर भारतात पसरला पाहिजे. लडाख परिसरातील विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे काम याच ऋषीने केले पाहिजे.’’
पाटील म्हणाल्या, ‘‘ टिळकांचे पुणे आहे हे सांगायला अभिमान वाटले. टिमविने राज्य घडवले आहे. बाजारूपणा न करता विद्यापीठाने शिक्षणाचा दर्जा कायम ठेवला. वैद्य, रोहित टिळक व इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावित डॉ. दीपक टिळक यांनी केले. पुरस्कारामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच विद्यापीठाच्या कामाची माहिती दिली. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.
ब्रिटिश काळात आपण राजकीय आणि मानसिक गुलाम होतो. त्यामुळे स्वदेशी वस्तूंना भाव नव्हता. आता देखील तीच स्थिती आहे. आपण आजही चीनमधून वस्तू आणत आहेत. लोकमान्य टिळक यांनी दिलेल्या स्वदेशीच्या नाऱ्याचे संदर्भ सध्या बदलले आहेत. पण स्वदेशीची आज देखील गरज आहे. नाहीतर आपण पुन्हा गुलामीच्या साखळीत अडकले जाऊ. आपल्याकडे निर्माण होत असलेल्या वस्तूंना मूल्य द्या व आयातीवर बहिष्कार घाला,’’ असा आवाहन यावेळी वांगचुक यांनी केले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




