मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस 'विक्रांत' साठी पैसे गोळा करुन ५८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी असा कोणताच घोटाळा केला नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तर सोमय्या यांनी गोळा केलेले पैसे राज्यपाल भवनात जमा केले नसल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांना मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएस विक्रांत युद्धनौका गैरव्यवहार प्रकरणात गृहविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या हे अन ट्रेसबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काल न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पण सोमय्या आऊट ऑफ कव्हरेज असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मोबाईल, फोन क्रमांकावर फोन केल्यानंतर स्वीय्य सहाय्यकाच्या नंबरवर फोन डायव्हर्ट केला आहे, असंही पोलीस सूत्रांनी सांगितले.
किरीट सोमय्या राजभवनात बनावट कागदपत्रे तयार करुन बचावाचा प्रयत्न करीत आहेत. सोमय्या यांच्या देशविरोधी कृत्यापासून राजभवनाने दूर रहावे असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
सोमय्या यांना वाचवण्यासाठी माफिया टोळीची राजभवनात ये-जा वाढली आहे. जुन्या तारखेची कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरु आहे. राजभवनात बनावट कागदपत्रे तयार करुन सोमय्या यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण आमचा न्यायालयावर विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.
सोमय्या आणि त्यांचा मुलगा फरार झाले आहेत. ते मेहुल चोक्सी जिथे लपला आहे तिथे तर गेले नाहीत याची भीती असल्याचे राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांतचा घोटाळा मोठा आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असंही राऊत म्हणाले.
आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा करण्यात आले ते पैसे राजभवनला भरले नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. विक्रांतचा पैसा त्यांनी पीएमसी बँकेत गुंतवले असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




