MMRDA : समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, एमएमआरडीएचा नवा प्लॅन काय ?

MMRDA’s New Plan: Direct Mumbai Access from Samruddhi Expressway Without Traffic : समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने-ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी आमने-साकेत दरम्यान 6 हजार कोटी रुपये खर्चून सुमारे 29 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. त्यामुळे सदरचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे. नागपूर-मुंबई 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावरून आलेल्या वाहनधारकांची सध्या आमने पासून ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे दीड-दोन तास वेळ लागतोय. (MMRDA new plan for Samruddhi Expressway to Mumbai connectivity)

एमएमआरडीएकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून थेट मुंबईत प्रवेश सुसाट होणार आहे. आमने-साकेतदरम्यान तब्बल ६ हजार कोटी खर्चून २९ किमी उन्नत मार्ग उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *