एकीकडे राज्यातील तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असून दुसरीकडे, बऱ्याच ठिकाणी उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून विदर्भात मात्र पारा वाढतच जात आहे. यातच रविवारपासून (ता. १०) पश्चिम विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस पडला. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे ४३.६ अंश सेल्सिअस इतकी झाली.
राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली असून काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर कायम आहे. त्यातच किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाडा अधिक जाणवू लागला आहे. दरम्यान ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार आहे. विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
सध्या मराठवाड्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले असून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. १०) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
येथे कमाल तापमान जास्त
मालेगाव ः ४२.६
चंद्रपूर ः ४२
वर्धा ः ४२.२
अकोला ः ४३.६
वाशीम ः ४३
अमरावती ः ४३
मध्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून विदर्भात मात्र पारा वाढतच जात.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




