Manoj Jarange Biography : शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, काँग्रेस कार्यकर्ता झाला मराठ्यांचा सरदार, मनोज जरांगेंचा धगधगता प्रवास

WHO IS MANOJ JARANGE PATIL? मराठा आरक्षणासाठी मागील १५ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील जिवाचे रान करत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी जमीनही विकली. काँग्रेसचा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले, पण ते मराठा आंदोलक झाले कसे? बारावीनंतर शिक्षण सोडलं, उदाहरनिर्वाहासाठी हॉटेलवर काम केलं, समाजकार्यासाठी जमीन विकली, मनोज जारंगे पाटील बाबतीत तुम्हाला माहितीये का? 

भूमिहीन नेता, समाजकार्यासाठी जमीन विकली...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो वाहनांच्या ताफ्यासह लाखो मराठ्यांना मुंबईत घेऊन धडक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे साधी दुचाकी आणि चारचाकी वाहन नाही. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खर आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराठीतून मुंबईचे दिशेने मोर्चा काढला. 27 ऑगस्टला मनोज जारंगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले आणि हजारो वाहनांसह लाखो मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये मनोज जरांगे पाटील नाव चर्चेत आलं.

बीडचे जरांगे जालन्यात कसे आले

मनोज जरांगे पाटील हे मूळ बीड जिल्ह्यातील आहे जवळपास वीस वर्षांपूर्वी त्यांचे वडील जालना जिल्ह्यात स्थायिक झाले. मनोज जारंगे पाटील यांनी बारावीनंतर शिक्षण सोडलं त्यानंतर ते आरक्षणाच्या चळवळीत सामील झाले उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं. जरांगे यांनी आतापर्यंत 30 पेक्षा अधिक वेळा आंदोलन केले आहे...

पत्र्याचं घर,स्वतःकडे वाहन नसणाऱ्या मनोज जरांगेंच्या रॅलीमध्ये हजारो वाहनांचा ताफा..

मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये हजारो वाहने चालत आहे.मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुचाकी नाही आणि चारचाकी वाहन देखील नाही हो हे खरं आहे हजारो वाहनांचा ताफा घेऊन जाणाऱ्या जरांगे पाटलांकडे एकही वाहन सध्या नाही. तर जालन्यातील अंकुश नगर येथे जरांगे पाटलांचं पत्र्याचं साधं घर आहे..

समाजकार्यासाठी जमीन विकली 

मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीचीच आहे. 2013 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे म्हणून त्यांनी शंभुराजे या नाटकाचे प्रयोग बीड, जालना अंबड ,शहागड येथे आयोजित केले. जालना येथील प्रयोगा दरम्यान एक हत्ती आणि दोन घोडे दगावले. त्यामुळे जरांगे पाटलांवर केस झाली आणि जरांगे पाटलांना याची भरपाई द्यावी लागली, त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाटक आयोजित करण्यात आले होते. त्या जिल्हा क्रीडा संकुलाचेही नुकसान झाले, तेव्हा तत्कालीन क्रीडा अधिकारी यांनी नुकसान भरपाईसाठी जरांगे पाटलांना नोटीस बजावली यातून जरांगे पाटलांना जमीन विकावी लागल्याची माहिती आहे.

काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष ते मराठा नेता 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते काही काळ जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र वैचारिक मतभेद असल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आणि ते राजकारणातून बाहेर पडले. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम केलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *