परळी डेपोजवळ एसटी वाहकाचा मृतदेह आढळला, आंदोलनाशी संबंधाबाबत अस्पष्टता

मुंबई: सायन रुग्णालयात एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महेश लोले असं या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या एसटी कर्मचाऱ्याचा एसटी आंदोलकांशी काही संबंध आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये 

महेश लोले एसटी  कंडक्टर होते. परळच्या एसटी डेपोजवळ ते मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर काल एसटी आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेकही केली, चपलाही फेकल्या. यावेळी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *