
Pune Rain : राज्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस हा पुणे जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचसोबत अनेक ठिकाणी ढगफुटीदेखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री बारामतीत कालवा फुटला, यामुळे सर्व पाणी शेतात गेले.
यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शेतीचा पाठपुरवठा करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहे.शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली.
हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.पुणे जिल्ह्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाने जिल्ह्यातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढले.त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरणे, नागरिक अडकणे अशा घटना घडल्या. प्रशासनाला मदतकार्यासाठी पथके रवाना करावी लागली आहेत.
बारामतीत ढगफुटी (Baramati Rainfall)
बारामतीमध्ये निरा डावा कालवा फुटलेला आहे. त्यातून अजूनही पाणी सुरू आहे . वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आलेला तर अनेक शेतीचं मोठं नुकसान या कालव्यामुळे झालेलं आहे तर गाड्याही रस्त्यावरती अडकलेल्या आहेत. याची पाहाणी अजित पवारांनी केली. तसेच बारामतीत अनेक ठिकाणी ढगफुटीदेखील झाली. यामुळे तीन ते चार इमारती खचल्या आहेत. इमारतीच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत.
|
Corona Virus Update : चिंताजनक! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी; धाकधूक वाढली |
NDRF चे पथकं पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात
एन डी आर एफ चे पथकं बारामती आणि इंदापूर मध्ये तैनात करण्यात आले आहे.पाण्याच्या कालव्यांमधील भगदाडांमुळे अनेक सखल भागातील रहिवासी परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने पथकांना तैनात करण्यात आले आहे.बारामतीमधील कारा नदी आणि इंदापूरमधील नीरा नदीचे पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे.
पुण्यात सर्वाधिक पावसाची नोंद
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाला बारामती आणि इंदापूर मधील पावसाचा अहवाल सादर केला आहे.बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झालेल्या पावसाची आकडेवारी अहवालातून समोर आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात ८३.६ मिमी पाऊस तर इंदापूर मध्ये ३५.७ मिमी पाऊस
बारामती मधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी
बारामती: ७७ मिमी
माळेगाव: ८२.८ मिमी
पनदरे: १०४.८ मिमी
वडगाव: ९६.३ मिमी
लोणी: ८६ मिमी
सुपा: ७६ मिमी
मोरगाव: ७५.५
उडवडी: ८५.३
शिर्सुफळ: ७४.३
इंदापूर मधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी
भिगवण: ६३.३ मिमी
इंदापूर: २३.५ मिमी
लोणी भापकर: ४८.३ मिमी
बावडा: २३ मिमी
काटी: २६.५ मिमी
निमगाव केतकी: १८ मिमी
अंथुरने: ४४ मिमी
पळसदेव: ४८.३ मिमी
लाखेवाडी: २६.५ मिमी
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




