
Solapur : एनटीपीसीसारखा मोठ्या औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून भरीव उत्पन्नाचे साधन हाती असलेल्या दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या अपहारप्रकरणी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्यांच्यावर चार कोटी ४२ हजार ९१ हजार ९९३ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
एनटीपीसी प्रकल्पामुळे फताटेवाडी ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये मोडली जाते. एनटीपीसी प्रकल्पाकडे मोठ्या प्रमाणावर असलेली मिळकतकर थकबाकी वसूल झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाचे राहणीमान बदलले होते. या ग्रामपंचायतीमध्ये मोठा अपहार झाल्याची तक्रार फताटेवाडी येथील रहिवासी विनोद रमेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे विभागीय महसूल आयुक्त आणि राज्याच्या लोकायुक्तांकडे केली होती. त्याचा पाठपुरावाही चालविला होता. त्यानुसार चौकशी झाली. त्यात अपहाराचा प्रकार उजेडात आला.
याप्रकरणी तालुका पंचायतीचे विस्ताराधिकारी सदाशिव कोळी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फताटेवाडी ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अपहार झाला आहे. विशेषतः तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्यांकनापूर्वी निधी खर्च करणे, एकाच कामावर दोन वेळा निधी खर्च करणे, एकाच कामाचे दुबार मूल्यांकन नोंदविणे, रोखीने खर्च करणे, एकाच कामासाठी दोन यंत्रणा कार्यरत ठेवणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता नियम २०११ चे पालन न करणे,
|
Pune : शिक्षण संस्थाचालकाकडे २५ लाखांची खंडणी मागणार्या माजी कर्मचार्यास अटक |
कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे, १५ व्या वित्त आयोगांतर्गत लेखासंहितेचे पालन न करणे, व्यक्ती, संस्था वा ठेकेदारांच्या नावाने निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करता देयके अदा करणे, एकाच ठेकेदाराला त्याची गुणवत्ता, कामाचा अनुभव आणि आर्थिक भांडवल न पाहता त्यास अनेक कामांचा मक्ता देणे आदी आक्षेपार्ह प्रकार घडले आहेत.
याशिवाय रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणानंतर डांबरीकरण करणे, रस्ते आणि भूमिगत गटारांच्या कामांचे तुकडे पाडणे, मंजूर असलेली कामे ग्रामपंचायत हद्दीच्या बाहेर करणे, साहित्याची खरेदी करताना जीईएम पोर्टलचा वापर न करणे, चौकशी समितीस दप्तर उपलब्ध करून न देणे, सरकारी रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा न करणे असेही आक्षेपार्ह प्रकार सरपंच, सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमत करून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी सुरू झाल्यापासून गेले अनेक दिवस सरपंच गायब झाले आहेत. त्यांचा व इतरांचा पोलीस शोध घेत आहेत
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

