पुणे - बालाजीनगर परिसरातील एका तरुणाला जबर मारहाण करीत, त्यास पाया पडायला लावून त्याचे व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने अटक केली. यापुर्वी सहकारनगर पोलिसांनी काही गुन्हेगारांना यापुर्वी अटक केली आहे.
सल्ल्या ऊर्फ सलमान हनिफ शेख (वय 22, रा.रजनी कॉर्नर, बालाजी नगर, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्ल्या शेख त्याचे साथीदार आदेश बिरामणी,आपान शेख, सौरभ भगत, सॅंडी ऊर्फ संदिप शेंडकर, सुफीयान व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी एका तरुणास "तु पुर्वी आमच्या गॅंग सोबत राहात होतास, आता का राहात नाहीस' अशी धमकी देत त्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यास मारहाण करीत, गुडघ्यावर बसवून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपान शेख याने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. या घटनेनंतर आरोपींनी हातामध्ये तलवार, कोयते, लोखंडी सळई घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्याचेही चित्रीकरण करुन तो व्हिडीओ समाजामध्यमांवर प्रसारीत केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या घटनेने सहकार नगर पोलिसही खडबडुन जागे झाले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ या घटनेतील काही आरोपींना अटक केली. दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी सलमान शेख हा घटना घडल्यापासून पसार झाला होता. दरम्यान, सलमान शेख हा आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी-कळस येथील एका हॉटेलसमोर येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचून शेखचा शोध घेतला. त्यावेळी त्याने पोलिसांना पाहून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली. त्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. शेखविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत,दंगा, मारामारी असे विविध प्रकारचे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी कादीर शेख, समीर पटेल, साधना ताम्हाणे,नागनाथ राख यांच्या पथकाने हि कारवाई केली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




