
Pune : राज्यातील महायुती सरकारचा काल नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहर्याना संधी देण्यात आली. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका मांडली असून अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करावे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलून ओबीसी समाजाच्या मतांचा अजित पवार यांनी अपमान केला असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, नागपूर येथे काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले. यामुळे ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला. पण दुसर्या बाजूला मागील कित्येक वर्षांपासून ओबीसी समाजाला न्याय मिळावा, यासाठी छगन भुजबळ हे कायम संघर्ष करीत राहिले असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.
|
|
तसेच दुसर्या बाजूला गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्री मंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे. यामुळे या दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले आहे. याबाबतच उत्तर राज्यातील ओबीसी समाजाला देण्यात यावं , अशी समाजाची मागणी आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सभासद म्हणून छगन भुजबळ असून त्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले. त्यामागे नेमकी कोणती कारणे होती. याबाबत अजित पवार यांनी समोर येऊन उत्तर द्यावे, अडीच वर्षाच्या मंत्रिपदाचा पायंडा पाडणारे अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री देणार असल्याचे पुढे सांगावे, आम्ही सर्व शांत बसू आणि छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
शहर
- मुंबई: दोन मिनिटांच्या उशिराने दोन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; परीक्षा केंद्राबाहेर अश्रूंचा बांध फुटला.
- पुणे: अखेर पावसाचे आगमन! पुण्यात मुसळधार तर साताऱ्यात दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा.
- मुंबई: गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंचा 'सायबर' फज्जा! "ती माझ्या मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी माझी," महाजनांचे भावूक स्पष्टीकरण.
- पुणे: वाहतूककोंडीतून सुटका होणार! रेल्वेफाटकमुक्तीसाठी पीएमआरडीए आणि महारेलचा ऐतिहासिक करार.
महाराष्ट्र
- मुंबई: दोन मिनिटांच्या उशिराने दोन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; परीक्षा केंद्राबाहेर अश्रूंचा बांध फुटला.
- अमरावती: भीषण थरार! डोळ्यात मिरची पावडर टाकून २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; ३ आरोपी गजाआड.
- पुणे: अखेर पावसाचे आगमन! पुण्यात मुसळधार तर साताऱ्यात दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा.
- परभणी: मंदिर सभामंडप कोसळून ५ जणांचा मृत्यू, विश्वस्तांकडून कंत्राटदारावर खापर; अमोल मिटकरींचा संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
गुन्हा
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'



























Subscribe to my channel


