
NCP Ajit Pawar : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बिहार पॅटर्न राबवला जावा आणि मला मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी मागणी अजित पवारांनीअमित शाह यांच्याकडे केली असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले होते. मात्र यामध्ये कसलेही तथ्य नसून मी मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिलं आहे. तसंच महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी केल्याची चर्चाही अजित पवारांनी फेटाळून लावली आहे.
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेमध्ये कसलंही तथ्य नाही. मी अमित शाह यांच्या बैठकीत त्यांच्याशी कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसह इतर प्रश्नांवर चर्चा केली. यापुढे कांद्याची निर्यातबंदी होऊ नये, तसंच आपण एफआरपीचे दर वाढवतो मात्र एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही, ती वाढ करावी, अशा विविध मागण्यांबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली," असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
|
Amravati : ३.६५ लाख शेतकऱ्यांना आजपासून अर्थसहाय्य; हेक्टरी पाच हजारांची मदत |
महायुतीत जागावाटपाचं काय ठरलं?
भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात किमान १५० जागा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. याविषयी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. हा फॉर्म्युला ठरल्यानंतर आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती देऊ.
लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या योजनेवरून महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांकडून या योजनेशी संबंधित एका पोस्टरवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाच फोटो लावण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. "मीच त्या पदाधिकाऱ्यांना माझा फोटो लावू नका, असं सांगितलं होतं. कारण सध्या माझा फोटो सगळीकडे लागत असल्याने त्या पोस्टरवर माझा फोटो नाही लावला तरी चालेल, असं मी सांगितलं होतं," असं अजित पवार म्हणाले.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



