
Pune Crime : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात भरदिवसा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहीला की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच गुरुवारी २२ ऑगस्टच्या मध्यरात्री पुण्यात एका सराईत गुन्हेगारीची हातोडीने ठेचून हत्या करण्यात आली. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव पुलाजवळील क्लासिक बारसमोर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय:३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील एका बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवाळ व त्याचे मित्र दारू पिण्याकरिता बसले होते. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिलावरून बारचालक आणि गोट्या शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला.
|
|
दारूचे बील न देताच गोट्या बार बाहेर जाऊ लागल्याने तेथील बाऊन्सरने त्याला हॉटेलबाहेर अडविले. त्यातून त्याचे बाऊन्सरबरोबर वाद सुरू झाले. यात वाद इतका टोकाला गेला की, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी बारलगत असलेल्या टायर पंक्चर दुकानातील हातोडी आणून बाऊन्सरने गोट्याच्या डोक्यात वार केला.
हातोडीचा घाव बसताच गोट्या जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करीत गोट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


