
Pune : पुण्याचा वाढता विस्तार आणि नवीन गावांच्या समावेशामुळे शहरात स्वतंत्र महापालिकेची तातडीने गरज असताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहरातील दुसऱ्या महापालिकेची भूमिका रविवारी पहिल्यांदाच जाहीरपणे मांडली. ‘लोकसंख्येचा वाढता ताण ही पुण्यावरील भविष्यातील मोठी समस्या होऊ शकते. येत्या काळात हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे,’ असे सूचक विधान पवार यांनी केले. पवार यांच्या सूचनेमुळे नवीन महापालिकेची गरज अधोरेखित झाली आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे पुणे महापालिकेच्या यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने नागरिकांना किमान प्राथमिक सुविधा पुरविण्यासही यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यात दोन वर्षांपासून एकही महापालिका अस्तित्वात नसल्याने सर्व कारभार राज्य सरकारच्या हाती आहे. पुण्यासाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. ‘हडपसर’ अशी नवी महापालिका स्थापन करावी, अशी आग्रही भूमिका सातत्याने मांडली आहे. शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडल्याने नवीन महापालिकेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
|
Vegetable Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, भाज्या झाल्या स्वस्त, जाणून घ्या आजचे दर |
प्रयत्न करण्याचे आश्वासन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या वानवडी येथील कार्यालयाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली. ‘लोकसंख्येचा वाढता ताण ही पुण्यावरील भविष्यातील मोठी समस्या होऊ शकते. येत्या काळात हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे,’ असे सूचक विधान पवार यांनी त्या वेळी केले. ‘हडपसर-हवेलीमधील नागरिकांचे मत जाणून मी या महापालिकेसाठी नक्की प्रयत्न करीन,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दा
पूर्व पुण्याच्या विकासामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हडपसर येथील मगरपट्टा सिटी, अॅमेनोरा, सीरम कंपनी, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहत, खराडी येथील ‘आयटी पार्क’ अशा मोठ्या प्रकल्पांना पवार यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागासाठी स्वतंत्र महापालिकेची गरज अधोरेखित करून या विषयाला वाचा फोडली आहे. दरम्यान, उरुळी आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी नगर परिषद करण्याऐवजी पुण्याच्या पूर्वेकडील आणखी गावांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आली.
पुणे महापालिकेची हद्द वाढत असल्याने प्रशासनावर ताण येत आहे. हडपसर; तसेच समाविष्ट नवीन गावांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. हडपसरसह या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे.
दहा वर्षांपासून प्रलंबित
पुण्याचा वाढता विस्तार पाहता नवी मुंबईप्रमाणे नव्या पुण्याची आवश्यकता आहे. पुण्यासाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. गेल्या दोन वर्षांत इचलकरंजी आणि जालना अशा दोन महापालिका नव्याने स्थापन झाल्या आहेत. पुण्याच्या महापालिकेचे विभाजन करून ‘पूर्व पुणे’ किंवा ‘हडपसर’ अशी नवी महापालिका स्थापन करण्याची हीच योग्य वेळ आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




