
Mumbai : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर मिहीर शहाला आज शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीने ओळख लपवण्यासाठी अपघातानंतर आपले केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयात युक्तीवाद केला. मिहीर शहाला घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी विरारमधून अटक केली.
शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहाने ७ जुलै रोजी मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये कावेरी नाकवा (४५ वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला होता. तर या महिलेचा पती प्रदीप नाकवा जखमी झाले होते. अपघातावेळी मिहीर शहा दारूच्या नशेमध्ये कार चालवत होता. त्याने महिलेला काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या घटनेनंतर मिहीर फरार झाला होता. त्याला घटनेच्या तिसऱ्या दिवशी अटक करत आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
|
|
मिहीरच्या कोठडीची मागणी करत पोलिसांनी बुधवारी मुंबईतील शिवडी न्यायालयात सांगितले की, घटनेनंतर किती लोकांनी मिहीरला मदत केली होती आणि त्याला इतके दिवस लपवून ठेवण्यासाठी कोणी मदत केली याचा शोध घेत आहोत. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही आणि अपघातानंतर आरोपीने टाकून दिलेल्या कारच्या नंबर प्लेटचा शोध घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी कारमध्येच कापली असा युक्तीवाद पोलिसांनी न्यायालयात केला. पोलिसांनी मिहीरला ७ दिवसांची कोठडी सुनवण्यात यावी अशी मागणी केली होती.
आरोपी मिहीर शाहच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, ड्रायव्हर आणि मिहीरची एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याचा फोनही ताब्यात घेतला आहे. त्याला पोलिस कोठडीची गरज काय?, असा प्रश्न मिहीरच्या वकिलाने उपस्थित केला. मिहीरच्या वकिलाने असेही सांगितले की, मिहीरला मंगळवारी अपघातस्थळी नेण्यात आले होते. जिथे त्याने संपूर्ण घटना सांगितली. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ड्रायव्हर आणि मिहीरचे म्हणणे जुळले असून पोलिसांनी मिहीरला अटक करण्याचे कारण सांगितलेले नाही.
शहर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- सिंधुदुर्ग: श्रीराम मंदिर दानपेटी प्रकरणी दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; काँग्रेसकडून निषेध
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
- ऐतिहासिक साटवली गढीचे बदलणार भाग्य! राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा
- पुणे: गोठ्यातील दूध काढण्याचे मशीन ठरलं जीवघेणं! विजेच्या धक्क्याने आंबेगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आईसह तिघे अटकेत; हतकणंगलेतील संतापजनक घटना
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- पालघरमध्ये रात्रीची धावपळ! दुर्वेस गावात घरात शिरला १५ किलो वजनाचा १० फुटांचा अजगर; वनविभागाकडून सुखरूप सुटका
- रायसेनमध्ये भीषण थरार! तरुणाने केली तरुणीची हत्या आणि त्यानंतर स्वतः संपवले आयुष्य; पोलीस तपास सुरू
- कर्नाटक: ₹20 च्या दंडाची मोठी किंमत! गृहपाठ न केल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न



























Subscribe to my channel


