
Ujani Boat Accident : उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जण बुडाले होते. यापैकी ५ जणांचे मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मृतदेहांमध्ये तीन पुरुष, एक महिला, एक लहान मुलाचा समावेश आहे. अजूनही एका व्यक्तीचा मृतदेह सापडला नसून त्याचा शोध घेणे सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीत मंगळवारी बोट बुडाल्याची घटना घडली होती.
|
|
नदीतील बोट उलटल्याने ६ प्रवासी पाण्यात बुडाले होते. एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. बुधवारी या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली. त्यानंतर बोटीवर असलेली मोटारसायकल देखील पथकाला सापडली.
मात्र, ३६ तास उलटूनही बोटीतील पाण्यात बुडालेले व्यक्ती आढळून आले नाहीत. बुधवारी दिवसभर शोधमोहीम राबविल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने गुरुवारी सकाळी पुन्हा बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला.
यावेळी पथकाला ६ पैकी ५ जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. अजूनही एकजण बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेत बुडालेल्या व्यक्तींमध्ये गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल दत्तात्रय जाधव (वय २५) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३) अनुराग अवघडे (वय ३५) गौरव धनंजय डोंगरे (वय १६) यांचा समावेश आहे.
शहर
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
महाराष्ट्र
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!


























Subscribe to my channel



