Nandurbar News : नंदुरबारला वादळी तडाखा; नर्मदा काठावरील शाळेचे उडाले पत्रे, घरांचीही पडझड

Nandurbar News : राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. या दम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून जोरदार वाऱ्यामुळे नर्मदा काठावर असलेल्या शाळेचे पत्र उडाले आहेत. यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
सातपुड्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील मानिबेली आणि थुवणी गावात नर्मदा नवनिर्माण अभियान यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या जीवन शाळेतील वादळी वाऱ्यांमुळे शाळेचे पत्रे उडाले. यात शाळेचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला असून मात्र गावातील आदिवासी कुटुंबियांनी बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सिमेंट पाण्यामुळे भिजले आहे. 
 
नंदुरबार  जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे देखील आगमन झाले. याचा फटका अनेकांना बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरे पडल्याने आदिवासी कुटुंबीयांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *