
Mumbai News : मुंबई आणि परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने विविध प्रयोग हाती घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत कृत्रिम पावसाचा प्रयोग, पाणी फवारण्यासाठी एक हजार टँकरचा पुरवठा करण्यासह अनेक सूचना केल्या. तर शहरात प्रवेश करणाऱ्या गाड्यांमुळे धूळ पसरत असल्याचा दावा करीत प्रवेशद्वारांवर चाके धुण्याचा प्रयोग पालिका करणार आहे.
मुंबईतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने महापालिकेसह संबंधित यंत्रणांना फटकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी या विषयावर बैठक घेतली. बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन उपस्थित होते. याखेरीज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक सूचना केल्या. उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका व विविध सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी आवश्यकतेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरात प्रदूषण कमी करण्याबाबच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असली तरी पावसामुळे हवेची गुणवत्ता काहीशी सुधारल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्यास ट्रक तसेच अवजड वाहनांना बंदी, धूर सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई, सम-विषम पद्धतीने वाहनांना रस्त्यावर आणण्याची परवानगी यासारख्या उपाययोजना आयआयटीच्या तज्ज्ञांनी सुचविल्या आहेत.
|
Mhada High Court : म्हाडानं पेशवाईप्रमाणे वागू नये, 24 तासांत ताबापत्र द्या; हायकोर्टाचा दणका |
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. दिल्लीमध्ये ‘क्लाऊड सिडिंग’ होणार असून त्याला यश आल्यास मुंबईतही त्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती चहल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याखेरीज महापालिकेने अन्य उपाययोजना सुरू केल्या असून त्याचा एक भाग म्हणून बाहेरून शहरात येणाऱ्या वाहनांची चाके धुण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर ‘वॉटर जेट स्प्रे मशीन’ बसवण्यात येणार असल्याचे चहल यांनी सांगितले. त्यासाठी गाड्या थांबवण्याची गरज भासणार नाही. चालत्या गाड्यांच्या चाकांवरच पाणी फवारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे धूळ कमी करण्यासाठी दररोज ६५० किमी रस्ते धुण्यात येणार असून आगामी काळात १००० किमी रस्ते धुण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. कचरा जाळण्याच्या घटना घडू नयेत कचराभूमीवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
रस्ते पाण्याने स्वच्छ करा. साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करा.
●रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवा.
●विकासकामांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी पत्रे लावा.
●शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवा.
●माती, राडारोडा झाकून वाहतूक होत नसेल तर कारवाई करा.
●महानगरांमध्ये नागरी वनक्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी पुढाकार घ्या.
●प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा दर आठवड्याला सादर करा.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



