Buldhana : बुलडाणा हादरलं! पत्नी आणि ४ वर्षीय मुलीला क्रूरपणे संपवून नवऱ्याची आत्महत्या

Buldhana News : बुलडाण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नी आणि ४ वर्षीय मुलीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

चिखली शहरातील शहरातील पंचमुखी महादेव परिसरातील ही घटना आहे. वर्षा दांडाले आणि कृष्णा दांडाले अशी मृत आई-मुलीचं नाव आहे. महिला पोलीस दलात कार्यरत होती. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा धक्कादायक घटना; 5 वर्षीय मुलावर डान्स शिक्षकाचा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, माथेफिरू पती किशोरने पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीची व चार वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने हत्या केली.पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर किशोरने स्वतःही २० किलोमीटरवर जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या चिखली पोलीस घटनास्थळावर असून महिला आणि चिमुरडी मुलीचे प्रेत ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *