
Wardha Crime News: पती-पत्नीचं भांडण काही नवीन गोष्ट नाही. संसाराचा गाडा हाकताना पती आणि पत्नीमध्ये वाद होत असतात. काही वेळा हे वाद समजूतीने मिटतात, तर काही वेळा ते विकोपाला सुद्धा जातात. यातून पुढे भयानक घटना घडतात. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका पतीने आधी पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: सुद्धा विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुंदन ज्ञानेश्वर कांबळे (वय ४५) व शीतल कुंदन कांबळे (वय ४०, रा. धुळवा) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.ही खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे दाम्पत्य काही वर्षांपासून आंजी (मोठी) येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये भाड्याने राहत होते. सायंकाळपर्यंत त्यांच्या घराचे दार उघडले नसल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत कुंदनच्या भावाला कळविले. भावाने लगेच धाव घेत आंजीच्या पोलिस चौकीत माहिती दिली असता पोलिसांनी रात्री आठ वाजता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने घराचे दार उघडल्यावर घरात बघितले असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांनी घटनेचा तपास केला असता कुंदन यानेच पत्नी शीतलची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: विष प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. यावेळी ठसे तज्ज्ञांसह प्रयोगशाळा तज्ज्ञांचाही चमू दाखल झाला होता.
दरम्यान, मृत दाम्पत्याला १३ वर्षांची मुलगी मैत्री व ९ वर्षांचा मुलगा सम्राट अशी दोन अपत्ये आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मैत्री आणि सम्राट हे दोघेही भाऊ-बहीण चार-पाच दिवसांपूर्वी धामणगाव (वाठोडा ) येथे आपल्या मामाच्या गावी गेले होते. त्यामुळे घरात पती-पत्नी हे दोघेच होते. वडिलांनी आईची हत्या करून स्वतः ही जीवनयात्रा संपविल्याने आता दोन्ही चिमुकले आई-वडिलांअभावी पोरकी झाले आहेत. आता त्यांच्यावर मोठे संकट कोसळलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




