Pune News : पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जवानाचा मृत्यू, प्रशिक्षण घेताना घडली घटना

Pune News: पुण्यामध्ये प्रशिक्षण घेत असताना जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या कॉलेज ऑफ मिलिट्रीमध्ये ही घटना घडली आहे. विजय पाडुरंग जाधव  असं या मृत जवानाचे नाव आहे. विजय यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय पाडुरंग जाधव (39 वर्षे) या जवानाचा मृत्यू झाला आहे. विजय हे मुळचे साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगावचे रहिवासी होते. पुण्यात कॉलेज ऑफ मिलिट्री येथे प्रशिक्षण घेताना त्यांचा मृत्यू झाला. प्रशिक्षणादरम्यान धावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

विजय जाधव यांच्या निधनामुळे साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. विजय जाधव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय जाधव हे भारतीय सैन्य दलात 114 बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमध्ये 21 वर्षांपासून कार्यरत होते. सध्या ते झाशीमध्ये कर्तव्य बजावत होते. पण पुण्यात प्रशिक्षण घेताना त्यांचा मृत्यू झाला. विजय जाधव यांनी शिक्षण पूर्ण केल्यांनतर 2001 मध्ये साताराच्या पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते.

त्यानंतर विजय जाधव यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर विजय यांची नेमणूक पतियाला या ठिकाणी झाली होती. विजय यांनी अमृतसर, श्रीनगर, झाशी आणि पुण्यात कर्तव्य बजावले होते. नाईक आणि हवालदार पदावर त्यांनी काम केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *