Thane News : कापूरबावडी परिसरात कोरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Thane : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कोरियन बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही. कापूरबावडी येथील सिने वंडर मॉल व कोरियन बिझनेस पार्क इमारतीला ही आग लागली आहे.

सदर घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, फायर वाहन व रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित आहेत. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *