
Maharashtra : आठवड्यात लाँग विंकेंड असणार आहे असं कळताच प्रत्येकजण कुठेतरी जाण्याचा विचार करत असतो. तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी जायची आवड असेल तर हे स्थळ तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या ठिकाणाला एव्हरग्रीन हिल स्टेशन असेही म्हणता येईल. कारण बाराही महिने हे ठिकाण अगदी थंड असते. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण असल्याने येत्या १ मे ला सुद्धा तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. तेव्हा हे ठिकाण कोणते आणि या ठिकाणी जायचं कसं ते आपण जाणून घेऊया
आज आपण 'आंबा घाट' या स्थळाबाबत जाणून घेणार आहोत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील महाबळेश्वरपाठोपाठ बाराही महिने थंड हवेसाठी 'आंबा गिरिस्थान' प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 750 मीटर उंचीवर असलेले हे पर्यटनस्थळ घाटमाथ्यावरचे उटी म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी फक्त हिवाळ्यातच जावं असं काही नाहीये. तर तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींसोबत तुम्हाला हव्या त्या वेळेत हव्या त्या ऋतूत या ठिकाणी एन्जॉय करण्यास जाऊ शकता. येथील हिरवंकंच निसर्गसौंदर्य बघून तुम्ही प्रेमात पडाल.
कोल्हापूर रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासाचा मध्यबिंदू असलेल्या आंबा गिरिस्थानात दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील कातीव कडे आणि घाटातील हजारो फूट खोल दऱ्याचे दृश्य अंगावर शहारे आणते. निसर्ग सौंदर्याने नटलेला वेडावाकडा घाट पर्यटकांना कायम भुरळ घालतो. - येथे गव्यांसाठी राखीव जंगल क्षेत्र आहे. अंबेश्वर देवराई, कोकण पॉइंट, वाघझरा, सडा, निसर्ग माहिती केंद्र, सनसेट पॉइंट, विसावा पॉइंट, नालाच्या आकाराचे चक्रीवळण, गायमुख, मानोली जलाशयातील बोटिंग, सासनकडा ही ठिकाणे मनाला मोहवून टाकतात. किल्ले विशाळगडाकडे जाणारा आंबा ते केंबुर्णेवाडी हा सोळा किलोमीटरचा दाट जंगलातील प्रवास पर्यटकांना आकर्षित करतो.
या ठिकाणी जाण्याची सर्वोत्तम वेळ
या ठिकाणी तसे तर बाराही महिने थंड वातावरण असते. परंतु तुम्हाला थंडीचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुम्हाला जानेवारी महिन्यात मनमोहक दृष्य देऊ शकते.
घाटात वाहन चालवताना घ्यावी विशेष काळजी
जानेवरी महिना - अतिशय सुंदर घाट असल्याने घाटात वाहने चालविताना विशेषतः पावसाळ्यात काळजी घ्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. घाटात खोल दऱ्या असल्यामुळे सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी करू नये. निसरडी वाट किंवा आडवळणाचा मार्ग टाळावा. निसर्ग ठिकाणांचे विद्रुपीकरण अजिबात करू नये.
जून ते ऑक्टाेबर या कालावधीतसुद्धा पावसाळा असल्यामुळे चोहोबाजूंनी हिरवा शालू पांघरलेले हिरवेगार निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवता येते. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली चिंब भिजता येते. काजव्याची अनोखी दुनिया अनुभवावयास येते. एप्रिल ते जून या कडक उन्हाळ्याच्या कालावधीत येथे पर्यटकांना गारवा मिळतो. रानमेवा चाखावयाला मिळतो.
मे व जून महिना - करवंदे, जांभळे, आंबे, फणस, तोरणे, नेर्ली, काजू असा रानमेवा तुम्हाला प्रत्यक्षात बघायचा असेल तर जून महिन्याचा पहिला पंधरवडा येथे जाण्याचा उत्तम काळ ठरू शकतो. येथे काजव्यांची अनोखी दुनियासुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान येथे मलबारी साप बघायला मिळतो. रानफुले व रानभाज्यांचा हंगाम असतो. हिवाळा व उन्हाळा या ऋतूत हॉर्नबिल व स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचे दर्शन घडते. दसऱ्याच्या वेळी ग्रामदैवत अंबेश्वर देवाचा मोठा जागर येथे असतो.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




