
बिबवेवाडी : शनिवारी दुपारी झालेल्या गारांच्या जोरदार पावसामुळे गावठाण परीसरात दाणादाण उडाली, रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पावसाचे येऊन तुंबल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यातच कोंढवा रस्त्यावर कुमार पार्क समोर झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.
महेश सोसायटी चौकात भूमिगत नाला तुंबून रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी आले त्यामुळे चौकाला चारही बाजूंनी पाण्याने घेरले होते, नाल्यावरील लोखंडी जाळी व तीन चेंबरची झाकणे पावसाच्या पाण्याच्या दाबाने उघडली होती त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर पाणी आले, महेश सोसायटी चौक ते भारत ज्योती बस थांब्या पर्यंत रस्त्याच्या एका बाजूला नदीचे स्वरुप आले होते,
अनेक वाहने अर्ध्या पर्यंत पाण्यात बुडाली होती, उघडलेल्या चेंबर मध्ये वाहने अडकून पडत होती, पाण्याच्या दाबाने चौकात अनेक वाहने पडली. भारत ज्योती बस थांब्यापासून अनेक वाहनचालकानी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने वाहने नेण्याचे प्रयत्न केल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती.
अप्पर बस डेपो समोर सीमेंटच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साठून राहिले होते त्यामुळे व्ही आय टी हॉस्टेल चौकातून येणारी वाहतूक खोळंबली त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन चौकात वाहतूक कोंडी झाली.
बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर कुमार पार्क सोसायटी समोर वीस वर्षे जुने झाड उन्मळून रस्त्यावर पडले सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही एका दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले, झाडा लगत रस्त्याला फुगे विकणार्याची पाल ठोकलेली आहे, जोराच्या पावसामुळे त्यांनी शेजारच्या इमारतीचा आसरा घेतला होता.
झाडा शेजारी एका गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे त्यासाठी खोदकाम झालेले आहे त्यामुळे झाडाच्या मुळांचा आधार ठिसूळ झाल्यामुळे झाड पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती, अग्निशामक दलाच्या जवानांनी एक तासात झाड तोडून जेसीबी च्या सहाय्याने बाजूला केले.
झाड पडल्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरून कोंढवाकडे जाणारी वाहतूक वसंत बाग चौकात थांबवली होती तर कोंढवा वरुन येणारी वाहतूक गंगा धाम चौकातून वळविण्यात आली होती त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
पावसाळी कामांच्या निविदा प्रक्रिया नुकत्याच झाल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी कामे सुरू झाली आहे, पावसाळ्यात पाणी साठलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तेथील कामे त्वरित पूर्ण करणार असल्याचे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश पवार यांनी सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


