
Pune Crime News : पुण्यातील वेल्हे तालुक्यातून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक सवॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (७ एप्रिल) रोजी घडली. दरम्यान पाण्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मिळून आला.
मोहीम हेमंत सराफ (वय .३०) राहणार घर नं. ६९ लक्ष्मीगल्ली कुठीर,लक्ष्मीपुरा वार्ड सागर राज्य मध्यप्रदेश असे युवकाचे असून तो बाणेर येथील एका खासगी कंपनीच्या मीटिंगसाठी पुण्यात आला होता. याबाबत निखिल किशोर बडगुजर (वय. २४) वर्ष भोसरी प्राधिकरण या अभियंत्याने वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पाेलिसांनी सांगितले की, ३ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी दुपारी दोन पर्यंत एका खासगी कंपनीची मीटिंग बाणेर, पुणे येथील अमर सदानंद टेक्नॉलॉजी पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंगसाठी कंपनीच्या संपूर्ण भारतातील कामगार उपस्थित होते.
शुक्रवारी ७ एप्रिल दुपारी ३ वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले व मुली यांचा ग्रुप पानशेत परिसरातील धिंडली (ता. वेल्हे) येथील एका रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले. रिसोर्ट फिरल्यानंतर सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले.
धरणाच्या बॅंकवॅाटरच्या पाण्यात गुडगाभर पाण्यात सर्वजण गेले, यावेळी मोहीम सराफ याचा पाय घसरुन खोल पाण्यात पडला. त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील यावेळी पाण्यात पडला. परंतू जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. यावेळी मोहीतला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहीतला पाण्यातून वर काढण्याचा खूप प्रयत्न केला.
मात्र, मोहीत हा खोल पाण्यात बुडाला. हजर असलेल्यांपैकी कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. घडलेला प्रकार स्थानिक ग्रामस्थ, रिसोर्टचे मालक आणि पोलिसांना कळताच त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे मदत मागवली.
घटनेची माहिती मिळताच मुळशीआपत्ती व्यवस्थापन समिती रवाना करण्यात आली. रात्री अंधार असल्याने कामात अडथळे येत होते. तेव्हा आज सकाळी दिवस उजडता पुन्हा कामाला सुरूवात करण्यात आली. १४ तासानंतर मोहीत सराफ याचा मृतदेह मिळून आला. यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मोलाचे सहकार्य केले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




