Pune News : वाकड पाेलिसांची माेठी कामगिरी, वाहन चाेरी टाेळी अटकेत; 21 लाख 50 हजारांच्या 43 Bike जप्त

Wakad : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीसांनी दुचाकी वाहन चोरी करणारी टोळी गजाआड केली आहे. या टाेळीकडून तब्बल 43 दुचाकी जप्त केल्या आहेत. या टाेळीच्या चाैकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार केशव महादेव पडोळे असे दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराच नाव आहे. तसेच नितीन राजेंद्र शिंदे, नवनाथ सुरेश मुटकुळे, ऋषिकेश अजिनाथ भोपळे आणि अमोल दगडु पडोळे यांना दुचाकी वाहन चोरी करणारे टोळीचे इतर सदस्य आहेत.

काकासाहेब डोळे (पोलिस उपायुक्त, पिंपरी चिंचवड झोन टू) म्हणाले ही टाेळी दुचाकी वाहन चोरी करून अत्यंत कमी किंमितीत विकत होती असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत वाकड पोलीसांनी 21 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या एकूण 43 दुचाकी वाहन जप्त केल्या आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *