Pune Crime: क्रूरतेचा कळस! आईनेच केली ४ वर्षीय पोटच्या पोरीची निर्घृण हत्या

Pune Crime : पुण्यातील हडपसर भागात काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय ४) असे या चिमुरडीच नाव आहे. जन्मदात्या आईनेच चाकू खुपसून आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संबंधी या लहान मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र नेमकं तिने ही हत्या कुठल्या उद्देशाने केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती यासाठी घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता.

शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, घरमालक व शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चिमुरडीचा खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निर्दयी आईने त्या 4 वर्षाच्या चिमूरडीची हत्या का केली ही अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत. हा घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *