
Mumbai Rain News : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या अवकाळी पावसाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. आज म्हणजेच मंगळवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईच्या भल्यापहाटे कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाऊस सुरू आहे. मुलुंड, विक्रोळी, अंधेरीत पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई उपनगर आणि आजुबाजूच्या परिसरात सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी बरसायाला सुरुवात झाली आहे.
मुंबई उपनगरातील अंधेरी, वर्सोवा, बोरिवली परिसरात रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकापासूनच अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्याने मॉर्निंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबईत अवकाळी पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस मुंबईतही धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मुंबईसह आजूबाजूच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रात्रीपासून ढग दाटले होते. यानंतर मुंबई पहाटे साडेपाच वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हा अवकाळी पाऊस मुंबईत बरसत आहे. मुंबईकरांची आजची सकाळ पावसाने सुरू झाली असून अद्याप सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




