
Pune : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटने टोल नाका हटाव या मागणीसाठी कृती समितीचे शेकडो सदस्य, मावळवातील रहिवासी हे महामार्गावर उतरले आहेत. महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सध्या पूर्णतः बंद करण्यात आली असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सोमाटने टोल नाका हटाव या मागणीसाठी कृती समिती लढा देत आहे. शनिवारपासून त्यांनी तळेगाव येथील विठ्ठल मंदिरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज महामार्गावर कृती समितीचे सदस्य, नागरिक गोळा झाले असून महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ही सध्या थांबवण्यात आली आहे. सोमाटने टोल नाका हा बेकायदेशीर आहे असा आरोप कृती समितीचे किशोर आवारे यांनी केला आहे. त्यांनी शनिवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हा टोल नाका आहे. सोमाटने आणि वरसोली असे दोन टोल नाके ३१ किलोमीटर अंतराच्या आत आहेत. प्रत्यक्षात ६० किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ चा नियम आहे. म्हणूनच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. २००६ ला हा टोल नाका सुरू झाला असून २०१९ मध्ये त्याची मुदत संपलेली आहे असा दावा आंदोलन कर्त्यांकडून करण्यात येतोय. शिवाय ८०० कोटी वसून करण्याची मुभा असताना प्रत्येक्षात अडीच हजार कोटी वसूल केल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. म्हणूनच सोमाटने टोल हटाव कृती समितीने बेकायदेशीर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी अशी मागणी करत अनेकदा आंदोलने केली आहेत. त्यामुळंच काही महिन्यांपूर्वी या टोल नाक्यावरून स्थानिकांना विनाटोल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.
मात्र कालांतराने टोल आकारणाऱ्यांनी पुन्हा टोल वसुली सुरू केली. त्यामुळेच पुन्हा एकदा सोमाटने टोल हटाव कृती समिती आक्रमक झालीय. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं असून आछा तर आज थेट रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु झालं आहे. याच आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पोहचणार आहेत. ते टोल नाका बंद करण्याच्या अनुषंगाने नेमकं काय भाष्य करतात का हे पाहणं म्हत्वाचं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




