Pune Crime : पुणे हादरलं! हिंजवडीत फुटपाथवर महिलेची चाकूने भोसकून हत्या

Pune Crime : महिलेच्या हत्येच्या घटनेने पुणे शहर हादलं आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एक माहिलेचा भर रस्त्यात खून झाल्याची घटना घडली आहे. हिंजवडीतील एका आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेची चाकून भोकसून हत्या करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन दरम्यान असलेल्या फुटपाथवर हा खून झाला. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती राठोड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. स्वाती राठोड हिला तिच्या पतीनेच चाकूने भोसकून संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्वाती ही कामगार महिला असून ती हिंजवडी परिसरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी आली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *