नाशिक : महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुका लांबल्याने १३ मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्व सूत्रे प्रशासकांच्या हाती आली असून सोमवारी (ता. १४) कार्यालयीन वेळेत नगरसचिव विभागाने महापौर, उपमहापौर यांच्यासह विरोधी पक्षनेते व अन्य पदाधिकाऱ्यांची कार्यालय ताब्यात घेतली. त्याचबरोबर जवळपास १२ वाहने ताब्यात घेत प्रशासकीय राजवटीचा प्रारंभ केला. दरम्यान, महापालिका आयुक्त कैलास जाधव विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत असल्याने प्रशासक म्हणून रीतसर कारभार हाती घेऊ शकले नाही. मंगळवार (ता. १५) पासून ते प्रशासक म्हणून नियमित कामकाजाला सुरवात करतील.
महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी १३ मार्चला रात्री बारानंतर संपुष्टात आल्यानंतर १४ मार्चला प्रशासकीय राजवट सुरू झाली. लोकनियुक्त लोकप्रतिनिधींऐवजी संपूर्ण कारभार प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त पाहतील. प्रशासक म्हणून आयुक्त हेच प्रमुख राहतील. मुंबईत कामानिमित्त असल्यामुळे प्रशासक कैलास जाधव उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मंगळवारी ते नियमित पदभार स्वीकारतील. त्याचप्रमाणे राज्य शासनाला पदभार स्वीकारल्याचा अहवाल सादर करतील, अशी माहिती नगर सचिव राजू कुटे यांनी दिली.
प्रशासकीय राजवट लागू झाल्याने महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांसह गटनेते, विविध समित्यांचे सभापती, उपसभापती यांची वाहने, कार्यालये व कार्यालयीन स्टाफ महापालिका प्रशासनाकडे जमा करावी लागतात. त्यानुसार सहा प्रभाग समित्यांचे सभापती, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते यांची वाहने नगरसचिव विभागाने ताब्यात घेतली. जोपर्यंत लोकनियुक्त सदस्यांचे सरकार येत नाही, तोपर्यंत स्थिती कायम राहील. राज्याचे नगरविकास विभागाने यापूर्वीच आयुक्त कैलास जाधव यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. आता यापुढे प्रशासक म्हणूनच प्रत्येक कागदावर मोहोर उमटणार आहे.
प्रशासकीय राजवटीत अशी होतील कामे
अंदाजपत्रकातील कामे करण्यासाठी विभागप्रमुखांकडून प्रस्ताव प्रशासकांना सादर केले जातील. प्रशासनप्रमुख प्रस्तावाची व्यवहार्यता तपासातील. प्रशासन प्रमुखांच्या मान्यतेनंतर नगरसचिवांकडे प्रस्ताव जाईल. नगरसचिवांकडून प्रस्तावाचे ठरावात रूपांतर होईल. ठराव क्रमांक टाकल्यानंतर तीन प्रती तयार करून पुन्हा प्रशासकाकडे अंतिम स्वाक्षरीसाठी सादर होतील. तीन प्रतिपैकी एक प्रत आयुक्त, एक प्रत नगरसचिव, तर एक प्रत अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या विभागप्रमुखांना सादर केली जाईल. प्रशासकीय राजवटीच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एकपासून ठरावावर क्रमांक पडतील. प्रशासकीय राजवटीमध्ये सूचक, अनुमोदक राहणार नाही.
मुद्रा वापरण्याचा उपायुक्तांना अधिकार
महापालिकेची मुद्रा वापरण्यासाठी वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका व अन्य संस्थांमध्ये होणारे करार करण्यासाठी या मुद्रेचा वापर केला जाईल. स्थायी समिती अस्तित्वात असताना या मुद्रेचा वापर होतो, मात्र आता प्रशासकीय राजवटीत मुद्रेचा वापर करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
तर महापौरांकडून भाडेवसुली
महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही सतीश कुलकर्णी रामायण बंगल्याचा काही दिवस वापर करणार आहेत, मात्र प्रशासनाकडून अल्टिमेटम देत यापुढे रामायण बंगल्याचा वापर करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. जर बंगल्याचा वापर होत असेल तर त्यावर भाडेदेखील आकारले जाणार आहे.
''पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यात प्रभागांतील विकासकामांचे अनेक प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रशासकीय राजवट लागू झाली तरी १४ मार्चनंतरही काही दिवसांसाठी महापौर निवासस्थान उपलब्ध राहू देण्यासाठी लेखी पत्र आयुक्त कैलास जाधव यांना पाठविले आहे.''
सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिकहे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




