CBI Raid : मुंबई-पुण्यात सीबीआयची छापेमारी! GST विभागाचे अधिकारी गोत्यात?

मुंबई-पुण्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी झाल्याचं वृत्त आहे. पुण्यात GST अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही छापेमारी टाकल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. या छाप्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठा ऐवजही जप्त केला आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. यामध्ये ४ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, संशयास्पद कागदपत्रे यांचा समावेश आहे.

मुंबई-पुण्यात मिळून एकूण तीन ठिकाणी सीबीआयनं हे छापे टाकले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं हे प्रकरणं असल्याचीही माहिती मिळते आहे. जीएसटी विभागानं दाखल केलेली केस बंद करण्यासाठी १ कोटी रुपायांची लाच मागितल्याची माहिती समोर येत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *